मुंबई - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची तक्रार थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसकडे असलेले मतदार दुरावत असल्याची तक्रार आपल्या पत्रातून केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस पिछाडीवर पडत असल्याचे या पत्रात त्यांनी म्हटल आहे. दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य हे हिंदू विरोधी असल्यामुळे देशातील हिंदू हा काँग्रेसपासून दूर होत चाललेला असल्याचे पत्रातून त्यांनी सांगितले.
त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत गंभीर दखल घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना समज द्यावी. तसेच पुढे त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नये अशा प्रकारची ताकीद देण्यात यावी अशोक पत्रातून म्हटले आहे. 2003 पासून दिग्विजय सिंह हे वादग्रस्त वक्तव्य करत आले आहेत. अनुच्छेद 370 कलम, बाटला हाऊस प्रकरणात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आणि ओसामा बिन लादेनला राज्यसभेत ओसामा बिन लादेनच्या नावापुढे जी जोडून काँग्रेसची प्रतिमा मलीन केली असल्याचे या पत्रात विश्व बंधुराया यांनी म्हटले आहे. तसेच उत्तर प्रदेश काँग्रेसची झालेली दुर्गती आणि मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या हातातून गेलेले सरकार याचे कारण दिग्विजय सिंह असल्या तर देखील आपल्या पत्रातून त्यांनी म्हटले आहे.
आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला डावलले जात असल्याची केली तक्रार
विश्वबंधू राय यांनी राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला डावलले जात असल्याची तक्रारही पत्राच्या माध्यमातून सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. राज्यात तीन पक्षाचा सरकार आहे. या तीन पक्षाच्या सरकारमध्ये काँग्रेस महत्त्वाचा पक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून काँग्रेसचा महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार विश्वबंधू राय यांनी पत्रातून सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. जाणून बुजून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच खच्चीकरण केले जात असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटल आहे.
हेही वाचा - Mumbai Corona : रुग्णसंख्येत किंचीत वाढ.. बुधवारी 635 नवे रुग्ण, 582 जणांना डिस्चार्ज