ETV Bharat / state

..या कारणांमुळेच खडसे, तावडे, मेहता, पुरोहीत यांचा पत्ता झाला कट ? - राज पुरोहीत कुलाबा

भारतीय जनता पक्षाने आपली चौथी यादी आज जाहीर केली. त्यात माजी मंत्री आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे, संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि पक्षाचे प्रतोद राज पुरोहीत यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पाहुया या नेत्यांचा का झाला पत्ता कट...

म्हणूनच झाला या नेत्यांचा पत्ता कट
author img

By

Published : Oct 4, 2019, 10:46 AM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाने आपली चौथी यादी आज जाहीर केली. त्यात माजी मंत्री आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे, संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि पक्षाचे प्रतोद राज पुरोहीत यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. खडसेंचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र तावडे, मेहता आणि पुरोहीत यांना उमेदवारी नाकरल्याची उलटसुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी तिकीट वाटपात आपली मुत्सद्दीगिरी दाखवून देत सर्वांनाच सुचक इशारा दिला आहे.

एकनाथ खडसे मुक्ताईनगर
एकनाथ खडसे भाजपचे जेष्ठ नेते. त्यांनी राज्यात पक्ष वाढवण्यास महत्वाची भूमिका होती. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली कामगिरीही उजवी होती. राज्यात सत्ता आल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र ऐन वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. खडसेंना मंत्री करण्यात आले. त्यांच्याकडे तब्बल १२ खाती देण्यात आली. त्यांचे कधीही मुख्यमंत्र्यांबरोबर पटले नाही. माझे सरकार असे खडसे नेहमी सांगत. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही जाहीरपणे लक्ष केले होते. या सर्व बाबींवर मुख्यमंत्र्यांची बारीक नजर होती. शेवटी एक वर्षाने खडसेंचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आले. त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. मंत्रीपद गेल्यानंतरही खडसे यांनी सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. पुढच्या काळातही खडसे त्रासदायक ठरू शकतात ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली असणार म्हणूनच त्यांची उमेदवारी कापली गेली असे राजकीय विश्लेशकांना वाटते.

विनोद तावडे बोरिवली
विनोद तावडे हे सत्ता येण्यापुर्वी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते होते. तावडेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, त्यांना शालेय शिक्षणमंत्री करण्यात आले. तावडे हे देवेंद्र फडणवीसांचे तसे प्रतिस्पर्धी म्हणावे लागतील. तावडे मराठा समाजाचे असल्याने भविष्यात मराठा नेता म्हणून ते पुढे आले असते. त्यामुळे राजकीय असुरक्षिततेची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पहिल्यापासूनच असणार असे राजकीय विश्लेषक सांगतात. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचाराचा पहिला आरोपही तावडे यांच्यावर झाला होता. ही माहिती मुख्यमंत्र्यांनीच विरोधकांना पुरवल्याचे काही राजकीय तज्ञ सांगतात. त्यानंतर एका मागोमाग भ्रष्टाचाराचे आरोप तावडे यांच्यावर झाले. हाच मुद्द पक्षश्रेष्ठींना पटवून दिल्यानंतरच त्यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यांना उमेदवारी नाकरण्याचा निर्णय हा धक्कादायक समजला जातोय.

प्रकाश मेहता घाटकोपर
प्रकाश मेहता हे भाजपचे जेष्ठ नेते. ते घाटकोपर पूर्व मतदार संघातून सलग ५ वेळा विधानसभेवर निवडून गेलेत. युती सरकारच्या काळातही ते मंत्री राहिले आहेत. पुन्हा भाजपचे सरकार राज्यात आल्यानंतर त्यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, अनेक वेळा त्यांनी पक्षालाच अडचणीत आणणारी विधाने केली. शिवाय त्यांच्यावरही बिल्डर लॉबीला फायदा करून देण्याचा आरोप झाला. त्याचवेळी मेहता यांचे पद जाणार होते. मात्र, अमित शाह यांच्या बरोबर असणारे थेट संबधाचा त्यांना फायदा झाला. हीच बाब मुख्यमंत्र्यांना खटकली असावी अशी चर्चा आहे.

राज पुरोहीत कुलाबा
राज पुरोहीत मुंबई भाजपचे अध्यक्ष राहीले आहेत. युती सरकारच्या काळात त्यांना राज्यमंत्रीपद भूषवले आहे. भाजपचे २०१४ ला सरकार आल्यानंतर त्यांना मात्र मंत्रीमंडळात घेण्यात आले नाही. मंत्रीमंडळात समावेश व्हावा यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. फडणवीसांच्या गोटात शिरण्याचाही प्रयत्न केला. मात्र, एका स्टिंग ऑफरेशनमुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरसाच दाखवत जोरदार टिका केली होती. मुंडे असते तर मीच किंगमेकर असतो असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी सारवासारव करत मी असे बोललोच नाही असे स्पष्टीकरण दिले होते. त्यांचे हे वक्तव्यच त्यांना उमेदवारी नाकारण्यास कारणीभूत ठरले असावे. शिवाय त्यांचे आणि मुंबई भाजपचे विद्यमान अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे संबध तेवढेसे चांगले नाहीत.

Intro:Body:

....म्हणूनच झाला  खडसे, तावडे, मेहता, पुरोहीत यांचा  पत्ता कट ?  

मुंबई -  भारतीय जनता पक्षाने आपली चौथी यादी आज जाहीर केली. त्यात माजी मंत्री आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे, संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि पक्षाचे प्रतोद राज पुरोहीत यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. खडसेंचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र  तावडे, मेहता आणि पुरोहीत यांना उमेदवारी नाकरल्याची उलटसुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी तिकीट वाटपात आपली मुत्सद्दीगिरी दाखवून देत सर्वांनाच सुचक इशारा दिला आहे.

एकनाथ खडसे मुक्ताईनगर 

एकनाथ खडसे भाजपचे जेष्ठ नेते. त्यांनी राज्यात पक्ष वाढवण्यास महत्वाची भूमिका होती. विरोधीपक्षनेते म्हणून त्यांनी केलेली कामगिरीही उजवी होती. राज्यात सत्ता आल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र ऐन वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. खडसेंना मंत्री करण्यात आले. त्यांच्याकडे तब्बल १२ खाती देण्यात आली. त्यांचे कधीही मुख्यमंत्र्यांबरोबर पटले नाही. माझे सरकार असे खडसे नेहमी सांगत. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही जाहीरपणे लक्ष केले होते. या सर्व बाबींवर मुख्यमंत्र्यांची बारीक नजर होती. शेवटी एक वर्षाने खडसेंचे भ्रष्ठाचाराचे प्रकरण बाहेर आले. त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. मंत्रीपद गेल्यानंतरही खडसे यांनी सरकारवर टिका करण्याची संधी सोडली नाही. पुढच्या काळातही खडसे त्रासदायक ठरू शकतात ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली असणार म्हणूनच त्यांची उमेदवारी कापली गेली असे राजकीय विश्लेशकांना वाटते.  

विनोद तावडे बोरिवली 

विनोद तावडे हे सत्ता येण्यापुर्वी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते होते. तावडेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, त्यांना शालेय शिक्षणमंत्री करण्यात आले. तावडे हे देवेंद्र फडणवीसांचे तसे प्रतिस्पर्धी म्हणावे लागतील. तावडे मराठा समाजाचे असल्याने भविष्यात मराठा नेता म्हणून ते पुढे आले असते. त्यामुळे राजकीय असुरक्षिततेची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पहिल्यापासूनच असणार असे राजकीय विश्लेषक सांगतात. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचाराचा पहिला आरोपही तावडे यांच्यावर झाला होता. ही माहिती मुख्यमंत्र्यांनीच विरोधकांना पुरवल्याचे काही राजकीय तज्ञ सांगतात. त्यानंतर एका मागोमाग भ्रष्टाचाराचे आरोप तावडे यांच्यावर झाले. हाच मुद्द पक्षश्रेष्ठींना पटवून दिल्यानंतरच त्यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यांना उमेदवारी नाकरण्याचा निर्णय हा धक्कादायक समजला जातोय. 

प्रकाश मेहता घाटकोपर     

प्रकाश मेहता हे भाजपचे जेष्ठ नेते. ते घाटकोपर पूर्व मतदार संघातून सलग ५ वेळा विधानसभेवर निवडून गेलेत. युती सरकारच्या काळातही ते मंत्री राहिले आहेत. पुन्हा भाजपचे सरकार राज्यात आल्यानंतर त्यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, अनेक वेळा त्यांनी पक्षालाच अडचणीत आणणारी  विधाने केली. शिवाय त्यांच्यावरही बिल्डर लॉबीला फायदा करून देण्याचा आरोप झाला. त्याचवेळी मेहता यांचे पद जाणार होते. मात्र, अमित शाह यांच्या बरोबर असणारे थेट संबधाचा त्यांना फायदा झाला. हीच बाब मुख्यमंत्र्यांना खटकली असावी अशी चर्चा आहे.

राज पुरोहीत कुलाबा   

राज पुरोहीत मुंबई भाजपचे अध्यक्ष राहीले आहेत. युती सरकारच्या काळात त्यांना राज्यमंत्रीपद भूषवले आहे. भाजपचे २०१४ ला सरकार आल्यानंतर त्यांना मात्र मंत्रीमंडळात घेण्यात आले नाही. मंत्रीमंडळात समावेश व्हावा यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. फडणवीसांच्या गोटात शिरण्याचाही प्रयत्न केला. मात्र, एका स्टिंग ऑफरेशनमुळे ते चांगलेच अडचणीत आले होते. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरसाच दाखवत जोरदार टिका केली होती. मुंडे असते तर मीच किंगमेकर असतो असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी सारवासारव करत मी असे बोललोच नाही असे स्पष्टीकरण दिले होते. त्यांचे हे वक्तव्यच त्यांना उमेदवारी नाकारण्यास कारणीभूत ठरले असावे. शिवाय त्यांचे आणि मुंबई भाजपचे विद्यमान अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे संबध तेवढेसे चांगले नाहीत.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.