ETV Bharat / state

फेकू आणि पप्पू जर नेटवर येत असेल तर ती टेक्निकल गोष्ट - विनोद तावडे - modi

भाजप प्रदेश कार्यालयात त्यांनी आज राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यथेच्छ टीका करत त्यांना " फेकू" संबोधले होते. ही टीका भाजपच्या अतिशय जिव्हारी लागली आहे.

मुंबईतील भाजप कार्यालयात बोलताना विनोद तावडे
author img

By

Published : Apr 8, 2019, 10:01 PM IST

मुंबई - इंटरनेट वर फेकू टाकलं की, मोदी यांचे नाव येते, तर पप्पू टाकले तर राहुल गांधी यांचे नाव येते, ही प्रोसेस हिट्सवर आधारित आहे. ही तांत्रिक कारणाने होत असल्याचे मनसेच्या आयटी सेलच्या लक्षात येत नाही. जनाधार नसलेल्या माणसाकडून आणखी काय अपेक्षा करणार असे भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले.

मुंबईतील भाजप कार्यालयात बोलताना विनोद तावडे

भाजप प्रदेश कार्यालयात त्यांनी आज राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यथेच्छ टीका करत त्यांना " फेकू" संबोधले होते. ही टीका भाजपच्या अतिशय जिव्हारी लागली आहे. अनेकजण मोदी यांच्या कार्यकाळात जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले असल्याची टीका करत आहेत. मात्र, त्यांनी हे स्पष्ट शब्दात सांगावे. काही कलाकारांच्या संघटना अभिव्यक्ती स्वातंत्र्यखाली मोदी यांना मतदान करू नका, असे आवाहन करत आहेत. हे अतिशय चुकीचे असून या पाच वर्षात एकाही कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची एकही घटना घडली नाही. मग नरेंद्र मोदी यांना मतदान करु नका, असे आवाहन करणारे कलाकार त्यांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड कशाला करत आहेत, असा रोखठोख सवाल तावडे यांनी केला.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काही कलाकारांनी मोदी यांना मत देऊ नका, असे आवाहन केले होते. परंतु तरीही भाजपला जास्त मते मिळाली होती. हे निर्दशनास आणून देताना तावडे म्हणाले, की पंडित नेहरु यांच्या काळात गीतकार मजरूह सुलतानपूरी यांनी नेहरुंच्या विरोधात काव्य लिहिल्यामुळे मोरारजी देसाई यांनी सुलतानपुरी यांना तुरूंगवास घडवला होता. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशाचा तुरूंग केला होता. किशोर कुमार यांच्या रेकॉर्डस् आकाशवाणीवर वाजवल्या जाणार नाहीत, असा फतवाही तेव्हा काढण्यात आला होता. त्याचप्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात शब्दर हाशमी यांना पथनाट्य सादर करताना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. परंतु गेल्या पाच वर्षात अशी एकही घटना मोदी सरकारच्या काळात घडली नाही, तरीही कलाकार असा विरोध कसा करतात, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Intro:फेकू आणि पप्पू जर नेटवर येत असेल तर ती टेकनिकल गोष्ट.... विनोद तावडे यांचा सवाल

मुंबई ८

इंटरनेट वर फेकू टाकलं की, मोदी यांचे नाव येते, तर पप्पू टाकले तर राहुल गांधी यांचे नाव येते, ही प्रोसेस हिट्स वर आधारित आहे, ही तांत्रिक कारणाने होत असल्याचे मनसेच्या आयटी सेलच्या लक्षात येत नाही. जनाधार नसलेल्या माणसाकडून आणखी काय यापेक्ष करणार असे भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे. भाजप प्रदेश कार्यलयात त्यांनी आजही राज ठाकरे यांच्या भाषणावर भाजपची प्रतिक्रिया व्यक्त केली. गुढी पाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यथेच्छ टीका करत त्यांना " फेकू" संबोधले होते.ही टीका भाजपच्या अतिशय जिव्हारी लागली आहे.

अनेकजण मोदी यांच्या कार्यकाळात जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले असल्याची टीका करत आहेत.मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात सांगावे. काही कलाकारांच्या संघटना अभिव्यक्ती स्वातंत्र्यखाली मोदी यांना मतदान करू नका असे आवाहन करत आहेत. हे अतिशय चुकीचे असून या पाच वर्षात एकाही कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची एकही घटना घडली नाही, मग नरेंद्र मोदी यांना मतदान करु नका असे आवाहन करणारे कलाकार त्यांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड कशाला करित आहेत असा रोखठोख सवाल तावडे यांनी केला.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकांत ही कलाकारांनी मोदी यांना मते देऊ नका, असे आवाहन केले होते, पण तरीही भाजपाला जास्त मते मिळाली होती हे निर्दशनास आणून देताना तावडे म्हणाले की, पंडित नेहरु यांच्या काळात गीतकार मजरूह सुलतानपूरी यांनी नेहरुंच्या विरोधात काव्य लिहिल्यामुळे मोरारजी देसाई यांनी सुलतानपुरी यांना तुरूंगवास घडवीला होता. तर इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात संपुर्ण देशाचा तुरूंग केला होता. किशोर कुमार यांच्या रेकॉर्डस् आकाशवाणीवर वाजविल्या जाणार नाहीत असा फतवाही तेव्हा काढण्यात आला होता. त्याचप्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात शब्दर हाशमी यांना पथनाट्य सादर करताना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. परंतु गेल्या पाच वर्षात अशी एकही घटना मोदी सरकारच्या काळात घडली नाहीये तरीही कलाकार असा विरोध कसा करतात असा सवालही त्यांनी यावेळी केला.Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.