ETV Bharat / state

आता मुंबईबाहेरही राज ठाकरेंच्या 'स्टँडअप कॉमेडीचे शो' सुरू; विनोद तावडेंची बोचरी टीका - mumbai

ठाकरे यांच्या सभेचा खर्च त्या ठिकाणच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवाराच्या खर्चात टाकावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे तावडेंनी सांगितले.

विनोद तावडे
author img

By

Published : Apr 13, 2019, 3:13 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपविरोधात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाहीर प्रचार करत आहेत. राज ठाकरेंच्या सभा म्हणजे 'स्टँडअप कॉमेडी शो' असून हे 'शो' आता मुंबई बाहेरही सुरू झाले आहेत, अशी बोचरी टीका भाजप नेते विनोद तावडे यांनी केली आहे.

विनोद तावडे यांची पत्रकार परिषद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, रायगड येथे भाजपविरोधात सभा घेणार आहेत. त्यांची शुक्रवारी नांदेड येथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मोदी यांच्यासह भाजपच्या कार्यप्रणालीवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांचे स्टँडअप कॉमेडी शो मुंबई बाहेर सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्या, असे ते म्हणत आहे. ठाकरे यांच्या सभेचा खर्च त्या ठिकाणच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवाराच्या खर्चात टाकावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे तावडेंनी सांगितले.

राज ठाकरे मोदी आणि शहा यांना संपवायची भाषा करत आहे. मात्र, त्यांचा साधा एक आमदार किंवा खासदारही आता राहिलेला नाही. अनेक देश मोदी यांना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार देत आहेत. मात्र, आपल्या देशात त्यांची तुलना हिटलरशी केली जाते. जगात हिटलरचे स्वागत कोणीच केले नाही. तसेच, सिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण होत आली आहे. आता कळेल कोण कुठे जाणार आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवारांनाही टोला लगावला.

मुंबईबाहेर राज ठाकरे यांची स्टँडअप कॉमेडी सुरू, विनोद तावडे यांची टीका

मुंबई । 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपविरोधात महाराष्ट्रातील काही भागात जाहीर प्रचार करत आहेत. या सभा स्टँडअप कॉमेडी आहेत आणि हे शो आता मुंबई बाहेर सुरू झाले आहेत, अशी खोचक टीका भाजप नेट्व विनोद तावडे यांनी केली, ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर, सातारा कोल्हापूर, सातारा, (पुणे),  (रायगड) येथे भाजप विरोधात सभा घेणार आहेत. कालच नांदेड येथे त्यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मोदी यांच्या कार्यप्रणालीवर टीका केली होती. 

यावर सभेवर प्रतिक्रिया देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की,  राज ठाकरे यांचे स्टँडअप कॉमेडी शो मुंबई बाहेर सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्या, असे ते म्हणत आहे. यावर आम्ही आता निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहोत की ठाकरे यांच्या सभेचा खर्च त्या ठिकाणच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवाराच्या खर्चात टाकावा. राज ठाकरे मोदी आणि शहा यांना संपवायची भाषा करत आहे पण पण त्यांचा साधा एक आमदार किंवा खासदार  
ही आता राहिलेला नाही. अनेक देश मोदी यांना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार देत आहेत. परंतु, आपल्या देशात त्यांची तुलना हिटलरशी केली जाते. जगात हिटलरचे  स्वागत कोणीच केलेले नाही. 
सिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण होत आली आहे मग आता कळेल कोण कुठे जाणार आहे, असे ते अजित पवार यांच्याबाबत म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.