ETV Bharat / state

शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत? विनोद तावडेंचा सवाल - मुंबई

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विधान अतिशय धक्कादायक असून, ते नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत? असा सवाल राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत? विनोद तावडेंचा सवाल
author img

By

Published : May 1, 2019, 8:56 PM IST

मुंबई - गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विधान अतिशय धक्कादायक असून, ते नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत? असा सवाल राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत? विनोद तावडेंचा सवाल

पुढे बोलताना तावडे म्हणाले, की गडचिरोलीतील हा हल्ला निषेधार्हच आहे. त्याचा करावा तितका निषेध कमी आहे. मात्र, लगेच शरद पवार गृहखाते, मुख्यमंत्री, जनाची नाही तर मनाची, अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करत आहेत. जनाची नाही तर मनाची हे वाक्य पवारांच्या तोंडी तरी शोभते काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मुंबई १२ मार्च १९९३ ला बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी हादरली होती. त्यावेळी विधिमंडळात शरद पवारांचा राजीनामा मागण्यात आला होता. छत्तीसगडमध्ये अलिकडेच एक नक्षलवादी हल्ला झाला. त्यामध्ये भाजपचे आमदार या हल्ल्यात मारले गेले. त्यावेळी हे पवार गप्प का होते? केवळ छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते म्हणून? काँग्रेसने देशद्रोहाचे कलम मागे घेण्याचे जे आश्वासन दिले आहे. त्या निर्णयाला आपण यासाठीच समर्थन दिले का? असा सवालही तावडेंनी उपस्थित केला.

Intro:Body:MH_VinodTawade_Naxal_Criticism1.5.19

शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत?
विनोद तावडे यांचा सवाल
मुंबई:गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विधान अतिशय धक्कादायक असून, नक्षल्यांचे बोल ते का बोलत आहेत, असा सवाल राज्याचे शिक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.
गडचिरोलीतील हल्ला हा निषेधार्हच आहे. त्याचा करावा तितका निषेध कमी आहे. पण, लगेच शरद पवार गृहखातं, मुख्यमंत्री, जनाची नाही तर मनाची अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करीत आहेत. जनाची नाही तर मनाची हे वाक्य पवारांच्या तोंडी तरी शोभते काय? 12 मार्चला 1993 मध्ये जेव्हा बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी मुंबई हादरली होती, तेव्हा विधिमंडळात त्यांचा राजीनामा मागण्यात आला होता. छत्तीसगडमध्ये अलिकडेच एक नक्षलवादी हल्ला झाला आणि त्यात भाजपाचे आमदार त्या हल्ल्यात मारले गेले. त्यावेळी हेच पवार गप्प का होते? केवळ छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते म्हणून? काँग्रेसने देशद्रोहाचे कलम मागे घेण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्या निर्णयाला आपण याचसाठी का समर्थन दिले, असा प्रश्नही विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.