मुंबई : काँग्रेसचे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना सोपवला आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना महसूल मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीका केली आहे. थोरात यांना जर पक्षांतर्गत काही अडचण होती तर त्यांनी आपल्या केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाला सांगणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला नाही. त्यावेळीच ते आजारी असल्याचे सांगून घरात थांबले मग आता कशासाठी राजीनामा देत आहेत? तेव्हाच राजीनामा का देता आला नाही? हे त्यांचे सोयीचे राजकारण आहे असा टोलाही विखे पाटील यांनी यावेळी लगावला आहे.
काँग्रेस अजून टिकून कशी? : या निमित्ताने राज्यातील काँग्रेसला आणखी खिंडार पडण्याची शक्यता आहे का? असे विचारले असता विखे पाटील म्हणाले, की वास्तविक राज्यातील काँग्रेस कधीच कमकुवत झाली आहे. खरंतर काँग्रेस इतके दिवस कशी टिकून आहे हा खरा प्रश्न आहे असही विखे पाटील म्हणाले आहेत. तसेच, काँग्रेसला राज्यात काहीही भवितव्य नाही हे दिसत असल्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांची पळापळ सुरू असल्याचा टोलाही त्यांनी यावेली लगावला आहे.
भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय नेत्यांचा : बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? असे विचारले असता विखे पाटील म्हणाले, की त्यांनी काँग्रेसमध्येच राहायचे का कुठे जायचे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि प्रदेशाध्यक्ष घेतील. त्यामुळे त्याबाबत आपण काही बोलणार नाही असे विखे पाटील यावेळी म्हणाले आहेत.
राहुल गांधी यांच्या भारत जोडोचा नकारात्मक सुर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभर भारत जोडो यात्रा झाली. मात्र, वास्तविक त्यांच्या फिरण्याने काय होणार? ते अतिशय नकारात्मक नेते आहेत? आजपर्यंत ते अपयशी ठरले आहेत. भारत जोडोच्या माध्यमातून त्यांनी आणखी एकदा अपयश समोर मांडले आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. तर अग्निवीर योजने संदर्भात आरएसएसने ही योजना आणली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला असला, तरी प्रत्येक योजनेबाबत ते नेहमीच नकारात्मक सूर लावत असतात त्यामुळे त्यांच्या अपयशी बोलण्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही असेही विखे पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा : काँग्रेसच्या बुडत्या जहाजात कुणीही बसायला तयार नाही; थोरातांच्या राजीनाम्यावर बावनकुळेंची खोचक टीका