ETV Bharat / state

तिवरे दुर्घटना: अवघ्या १९ वर्षातच धरण फुटले कसे?; वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल - रत्नागिरी

तिवरे धरण बांधून फक्त १९ वर्षे झाली. धरणाचे आयुष्यमान साधारणपणे १०० वर्ष असताना अवघ्या १९ वर्षातच धरण फुटले कसे? असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Jul 3, 2019, 5:29 PM IST

Updated : Jul 3, 2019, 6:55 PM IST

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेले मृत्यू सरकारच्या निष्क्रीयतेचे बळी आहेत. धरण नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आल्यानंतरही सरकारने कारवाई केली नाही. त्यामुळे या घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे सरकारवर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करावा. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच हे धरण बांधलेल्या स्थानिक सदानंद चव्हाण यांच्या कंपनीला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. गांधीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तिवरे धरण दुर्घटनेबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार

तिवरे धरण बांधून फक्त १९ वर्षे झाली. धरणाचे आयुष्यमान साधारणपणे १०० वर्ष असताना अवघ्या १९ वर्षातच धरण फुटले कसे? असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला. धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. या धरणाचे काम स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांच्या खेमराज कंपनीने केले आहे. त्यामुळे दुर्घटनेला ही कंपनी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

काय आहे नेमकी तिवरे धरण दुर्घटना? वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

तिवरे धरण फुटल्याने १३ घरे वाहून गेली आहेत. आतापर्यंत ११ मृतदेह मिळाले आहेत, तर १८ जण अद्यापही बेपत्ता असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. स्थानिक लोकांनी धरणाला गळती लागली असल्याची तक्रार जलसंपदा खात्याकडे केली होती. त्यानंतर मे महिन्यात त्याची डागडूजी केल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. मात्र, डागडूजी करूनही धरण फुटलेच कसे? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तसेच गिरीश महाजन यांनी या घटनेची जबाबदारी स्विकारून जलसंपदा मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

सरकारने राज्यातील सर्व धरणाचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच त्यांनी तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

Intro:तिवरे धरण प्रकरणी सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करा - विजय वडेट्टीवार

(मोजावर व्हिडीओ पाठवले आहेत ते वापरावेत)
मुंबई, ता. ३ :
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेले मृत्यू हे सरकारच्या निष्क्रियतेचे बळी आहेत. धरण नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आल्यानंतरही सरकारने कारवाई केली नाही यामुळे याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याने सरकारने ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच हे धरण ज्या‍ स्थानिक सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने बांधले त्यांनाही यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
मुंबईतील गांधीभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार पर‍िषदेत वडेट्टीवार म्हणाले की, हे धरण बांधून फक्त १९ वर्षे झाली. धरणाचे आयुष्यमान साधारणपणे १०० वर्ष असताना अवघ्या १९ वर्षातच धरण फुटते कसे? असा प्रश्न उपस्थित करुन या धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. या धरणाचे काम स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांच्या खेमराज कंपनीने केले आहे. त्यामुळे दुर्घटनेला ही कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करुन या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तिवरे धरण फुटल्याने १३ घरे वाहून गेली आहेत तर आतापर्यंत १० मृतदेह मिळाले असून अजून १८ जण बेपत्ता असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या घटनेतील मृतकांना श्रद्धांजली अर्पण करून ते पुढे म्हणाले की, या धरणाला गळती लागली असल्याची तक्रार स्थानिक लोकांनी जलसंपदा खात्याकडे केली होती. त्यानंतर मे महिन्यात त्याची डागडुजी केली असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे. डागडुजी करूनही धरण फुटलेच कसे, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित करत याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून जलसंपदा मंत्रयानीही राजीनामा द्यावा, तसेच सरकारने राज्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे अशी मागणीही विरोधी पक्ष नेत्यांनी केली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यशवंत हाप्पे उपस्थित होते.
Body:तिवरे धरण प्रकरणी सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करा - विजय वडेट्टीवारConclusion:
Last Updated : Jul 3, 2019, 6:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.