ETV Bharat / state

वाघनखे भारतात आणण्यास होत आहे उशीर; विरोधकांचा हल्लाबोल तर सत्ताधाऱ्यांचे सडेतोड उत्तर - सत्ताधाऱ्यांचं उत्तर

Vijay Wadettiwar On Sudhir Mungantiwar : विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातील वाघनखं (Wagh Nakh) भारतात कधी येणार? याबाबत ट्विटरवरुन सुधीर मुनगंटीवारांना (Sudhir Mungantiwar) खोचक सवाल केलाय.

Vijay Wadettiwar On Waghnakh
वाघनखे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 7:55 PM IST

प्रतिक्रिया देताना प्रवक्ते राम कुलकर्णी

मुंबई Vijay Wadettiwar On Sudhir Mungantiwar : लंडन स्थित 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट' वस्तुसंग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे (Wagh Nakh) नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात आणली जातील, असं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाशी सामंजस्य करार सुद्धा केला होता. या करारामध्ये नोव्हेंबर 2023 पासून तीन महिने वाघनखे भारतात राहतील असं नमूद करण्यात आलं होतं. परंतु या प्रक्रियेस आता विलंब होत असल्यानं ही वाघनखे यावर्षी मे महिन्यामध्ये भारतात येतील अशी माहिती समोर आली आहे. यावरून विरोधी पक्ष नेते, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ट्विटद्वारे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय आहे वडेट्टीवार यांच्या ट्विटमध्ये : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारला टोला लगावला आहे. वडेट्टीवार म्हणाले आहेत की, नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला, परंतु सुधीर भाऊ वाघनखे कुठपर्यंत पोहोचली? सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून तुम्ही वाघनखे आणायला लंडनला गेलात. परंतु रिकाम्या हाताने परत आलात. तेव्हा वाघनखे नोव्हेंबरमध्ये भारतात येतील, असं तुम्ही सांगितलं होतं. तो महिना सुद्धा गेला. वर्षही संपलं आता २०२४ उजाडलं आहे. त्यामध्ये जानेवारीचा मुहूर्त सुद्धा हुकला आहे. परंतु वाघनखे काही आली नाहीत. आता परत एकदा लंडनवारी करणार की, तुम्ही पुढची तारीख देणार? असा प्रश्नही ट्विट करत वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

दीडशे ते दोनशे वर्ष तुम्हाला काहीचं सुचलं नाही : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, त्याला भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. कुलकर्णी म्हणाले आहेत की, मला विजय वडेट्टीवार यांना विचारायचं आहे, 'वाघनखे ही आमची अस्मिता' आहे. परंतु दीडशे ते दोनशे वर्षे तुम्हाला काहीचं सुचलं नाही. इतकी वर्षे तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्हाला काही सुचलं कसं नाही. आता आमची सत्ता आल्यानंतर आम्ही ठरवलं आहे की, महाराजांची वाघनखे आम्ही परत आणणार, परंतु हे इतकं सोप्प आहे का? जे ब्रिटिश महाराजांची वाघनखे घेऊन गेले, त्याचा जो काही कागदोपत्री पुरावा आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही सुरू केला आहे. परंतु आम्ही वाघनखे आणणार, म्हणजे आणणार. पण तुम्ही थट्टा का करत आहात. याबाबत मंत्री सुधीर मुनगंटीवार लक्ष ठेवून आहेत. विजय वडेट्टीवार यांनी कुठल्याही विषयावर राजकारण करू नये. ही तारीख पे तारीख नाही आहे. याबाबत योग्य तो पाठपुरावा सुरू आहे. पण तुम्ही कुठल्याही प्रश्नावर राजकारण करता, हे थांबवायला पाहिजे. असा टोलाही राम कुलकर्णी यांनी लगावला आहे.

हेही वाचा -

  1. Chhatrapati Shivaji Maharaj : 'शिवरायांची जगदंबा तलवार, वाघ नखे यावर्षीच महाराष्ट्रात आणणार'
  2. Fake Tiger Claws : त्र्यंबकेश्वर शहरात वन खात्याच्या छाप्यात नकली वाघ नखे, दात जप्त
  3. कराडमध्ये वाघ, बिबट्याची 11 नखे जप्त; दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.