ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी का दिला राजीनामा?

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात आले, अजूनही लावले जात आहेत. मात्र, यात किती तर्क बरोबर होते हे सांगणे कठीण आहे. पण आम्ही तुम्हाला काही असे तर्क सांगणार आहेत जे वाचून खरोखर तुम्हाला प्रश्न पडेल....

vidhansabha election 2019 ajit pawar resigns from dcm post
भाजपची पत वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा
author img

By

Published : Nov 26, 2019, 3:27 PM IST

Updated : Nov 26, 2019, 3:56 PM IST

मुंबई - अजित पवार यांनी अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस उद्या (बुधवार) होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाला यशस्वीपणाने सामोरे जावू शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अजित पवारांना राजीनामा द्यायला सांगून भाजपची पत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पुरेसे संख्याबळ नसताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आहेत, त्यांच्या या पदाचा फडणवीस यांनी स्थापन केलेले सरकार वाचवण्यासाठी तांत्रिक फायदा होईल असा व्होरा भाजपमधील धुरीणांना होता, मात्र तो सपशेल फोल ठरला.

महाराष्ट्राचा निकाल जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला. मात्र, प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा तिढा सुटलेला नाही. रोज नवे डावपेच आणि खेळ सुरू आहेत. महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, असे वाटत होते. तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेत 'मी पुन्हा येईन' हे वक्तव्य खरे करून दाखवले होते. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी बेकायदेशीररित्या हा निर्णय राज्यपालांनी घेतला असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

तेव्हा आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला, त्यात न्यायालयाने भाजपला उद्या (27 नोव्हेंबर) ला 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच या मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात आले, अजूनही लावले जात आहेत. मात्र, यात किती तर्क बरोबर होते हे सांगणे कठीण आहे. पण आम्ही तुम्हाला काही असे तर्क सांगणार आहेत जे वाचून खरोखर तुम्हाला प्रश्न पडेल....

१) काल (मंगळवार) शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये 162 आमदारांचे शक्तीप्रदर्शन केले. विचार करण्याची बाब म्हणजे, या तिन्ही पक्षांना शक्तीप्रदर्शनाची गरज का भासली ?

२) 162 आमदारांच्या शक्तीप्रदर्शनात खुद्द शरद पवार यांना तुमची आमदारकीच्या जबाबदारी मी घेतो, असे म्हणून त्यांना बळ दिले. त्यामुळे खरोखरचं 162 आमदारांची भाजपला भीती वाटते का? असे शरद पवार यांना वाटत आहे का? हा प्रश्न नक्कीच पडतो.

३) अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सतत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. अजित पवारांना का इतकी मोकळीक देण्यात येत आहे. पक्षांच्या नियमांचे उल्लंघन केले तरी अजित पवार यांची पक्षातून हकालपट्टी का करण्यात आलेली नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Nov 26, 2019, 3:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.