ETV Bharat / state

मातोश्रीच्या गडाला काँग्रेसच्या २७ वर्षीय झिशान सिद्दिकीने लावला सुरुंग..!

author img

By

Published : Oct 24, 2019, 6:30 PM IST

Updated : Oct 24, 2019, 8:11 PM IST

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने अत्यंत प्रतिष्ठेचा बनवला होता. शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत होत्या. मात्र त्यांचा सेनेकडून ऐनवेळी पत्ता कापून त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या अट्टहासामुळे याठिकाणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती. शेवटच्या दिवसापर्यंत परब यांनी प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका मातोश्रीच्या अंगणाला बसला असून मातोश्रीचे अंगण आता काँग्रेसच्या ताब्यात गेले आहे.

मातोश्रीच्या गडाला काँग्रेसच्या झीशान सिद्दिकीने लावला सुरुंग

मुंबई - वांद्रे पूर्व विधानसभा या मातोश्रीच्या गडाला काँग्रेसच्या 27 वर्षीय झिशान या तरुण उमेदवाराने मातोश्रीच्या गडाला सुरुंग लावत आत्तापर्यंत या मतदारसंघातील सेनेची मक्तेदारी मोडीत काढत आपला विजय मिळवला.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने अत्यंत प्रतिष्ठेचा बनवला होता. शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत होत्या. मात्र त्यांचा सेनेकडून ऐनवेळी पत्ता कापून त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या अट्टहासामुळे याठिकाणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती. शेवटच्या दिवसापर्यंत परब यांनी प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका मातोश्रीच्या अंगणाला बसला असून मातोश्रीचे अंगण आता काँग्रेसच्या ताब्यात गेले आहे.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाबद्दल माहिती देताना आमचे प्रतिनिधी संजीव भागवत..

आज सकाळी वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. त्यावेळी तब्बल आठव्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर हे ३ हजार आणि त्याहून अधिक मतांनी आघाडीवर होते. परंतु त्यानंतर काही काळ चित्र बदलले. शिवसेनेच्या बंडखोर नेत्या व अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत या पुढील काही फेरीमध्ये आघाडीवर आल्या. मात्र ही आघाडी 14 फेरीनंतर बदलली आणि त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार झीशान सिद्दीकी यांनी आघाडी घेतली आणि ती एकोणिसाव्या या अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवत दणदणीत विजय मिळवला.

सिद्दीकी यांनी 5 हजार 567 अधिक फरकाने विजय मिळवला. तर एकूण ३८ हजार ३३७ एकूण मते मिळवली. तर सेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना 32 हजार 069 आणि अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत यांना 23 हजार 856 तर एमआयएमच्या मोहमद सलीम यांना 12 हजार 426 मते मिळाली आहेत.

मातोश्रीच्या अंगणातील हा पराजय शिवसेनेला इतका जिव्हारी लागला की, पराजयाच्या पूर्वीच शिवसेनेचे नेते उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे नेते अनिल परब हे या परिसरातून काही काळासाठी गायब झाले होते. मात्र त्यानंतर ते जवळच असलेल्या शिवसेनेच्या शाखेत सायंकाळी आपल्या अनेक कार्यकर्त्यांच्या सभेत हजर झाले. परंतु त्याठिकाणी भयाण शांतता पसरली होती आणि आपल्या कार्यकर्त्यांना झालेल्या चुका आपण सुधारून घेऊ, असा आश्वासन देत त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांचा आपण शोध घेऊ असे आश्वासन देऊन येथील कार्यकर्त्यांना पाठवून दिले. मात्र माध्यमांशी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास त्यांनी टाळले.

Intro:मातोश्रीच्या गडाला काँग्रेसच्या झीशान सिद्दिकीने लावला सुरुंग !

mh-mum-01-vandre-e-zishan-vhij-7201153

(Mojo यासाठीचे सर्व फीड पाठवले आहे)

मुंबई, ता. २४ :

वांद्रे पूर्व विधानसभा या मातोश्रीच्या गडाला काँग्रेसच्या 27 वर्षीय झीशान या तरुण उमेदवाराने मातोश्रीच्या गडाला सुरुंग लावत आत्तापर्यंत या मतदारसंघातील सेनेची मक्तेदारी मोडीत काढत आपला विजय मिळवला.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने अत्यंत प्रतिष्ठेचा बनवला होता. शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत होत्या. मात्र त्यांचा सेनेकडून ऐनवेळी पत्ता कापून त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या अट्टहासामुळे याठिकाणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती. शेवटच्या दिवसापर्यंत परब यांनी प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका मातोश्रीच्या अंगणाला बसला असून मातोश्रीचे अंगण आता काँग्रेसच्या ताब्यात गेले आहे.
आज सकाळी वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी तब्बल आठव्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर हे ३ हजार आणि त्याहून अधिक मतांनी आघाडीवर होते. परंतु त्यानंतर काही काळ चित्र बदलले. शिवसेनेच्या बंडखोर नेत्या व अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत या पुढील काही फेरीमध्ये आघाडीवर आल्या. मात्र ही आघाडी 14 फेरीनंतर बदलली आणि त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी आघाडी घेतली आणि ती एकोणिसाव्या या अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवत आपला दणदणीत विजय मिळवला. सिद्दीकी यांनी
5 हजार 567 अधिक फरकाने विजय मिळवला. तर एकूण ३८ हजार ३३७ एकूण मते मिळवली. तर सेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना 32 हजार 069 आणि अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत यांना 23 हजार 856 तर एमआयएमच्या मोहमद सलीम यांना 12 हजार 426 मते मिळाली आहेत.

मातोश्रीच्या अंगणातील हा पराजय शिवसेनेला इतका जिव्हारी लागला की, पराजयाच्या पूर्वीच शिवसेनेचे नेते उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे नेते अनिल परब हे या परिसरातून काही काळासाठी गायब झाले होते. मात्र त्यानंतर ते जवळच असलेल्या शिवसेनेच्या शाखेत सायंकाळी आपल्या अनेक कार्यकर्त्यांच्या सभेत हजर झाले. परंतु त्याठिकाणी भयाण शांतता पसरली होती आणि आपल्या कार्यकर्त्यांना झालेल्या चुका आपण सुधारून घेऊ असा आश्वासन देत त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांचा आपण शोध घेऊ असे आश्वासन देऊन येथील कार्यकर्त्यांना पाठवून दिले मात्र माध्यमांशी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास त्यांनी टाळले. Body:मातोश्रीच्या गडाला काँग्रेसच्या झीशान सिद्दिकीने लावला सुरुंग !Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.