ETV Bharat / state

Raigad Bus Accident: बस अपघातामध्ये मृत्यू झालेल्या आठ वर्षाच्या वीरचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, ढोलवादनात दिसून येतो उत्साह - बस अपघात

शनिवारी पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गवर खासगी बसचा अपघात झाला. या भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Private Bus Accident
खासगी बसचा अपघात
author img

By

Published : Apr 16, 2023, 8:07 AM IST

खासगी बसचा अपघात

मुंबई : गोरेगाव येथील वीर बाजीप्रभू ढोल ताशा पथक पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गेले होते. ते मुंबईत परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ वर्षांचा चिमूरडा देखील मृत्युमुखी पडल्याने गोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ढोल वाजवायला गेलेल्या आठ वर्षीय वीर मांडवकर याचा व्हिडिओ वायरल होत आहे.

दरीत बस कोसळली : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराशेजारी असलेल्या खोल दरीत खासगी बस कोसळली. या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे 4 वाजता झालेल्या या भीषण अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आटोपून मुंबईत येत असताना हा अपघात झाला. मुंबई पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील वीर बाजीप्रभू ढोल ताशा पथकातील तरुण-तरुणी या खाजगी बसमधून प्रवास करत होते. यात आठ वर्षाच्या वीर मांडवकरवर शनिवारी पहाटे काळाने घाला घातला.

परफॉर्मन्स शेवटचा ठरला : आवड म्हणून ढोल वाजवणाऱ्या वीरचा पुण्यातील कार्यक्रमातील हा परफॉर्मन्स शेवटचा ठरला आहे. ढोल वाजवण्यासाठी पुण्याला गेलेल्या वीर आता कधीच घरी परतणार नाही. वीरच्या मृतदेहावर रात्री 10.30 वाजताच्या सुमारास गोरेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. वीर मांडवकर हा गोरेगाव येथील संतोष नगरमध्ये आपल्या आईसोबत राहत होता. काही कौटुंबिक कारणामुळे वीरचे वडील वेगळे राहत होते.

ढोलवादन शेवटचे ठरले : वीर आपल्या आईसोबत आजीकडे (आईच्या आईकडे) राहत होता. त्यामुळे वीरच्या अपघाती मृत्यूमुळे आईसह आजीवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. चिमुकल्या वीरच्या अचानक जाण्याने गोरेगावातील संतोष नगर परिसरात शोककळा पसरली आहे. वीर बाजीप्रभू ढोल ताशा पथकातील वीर मांडवकर हा सर्वात लहान सहभागी होता. 8 वर्षांच्या वीर मांडवकरचे आंबेडकर जयंतीच्या दिवशी केलेले हे ढोलवादन शेवटचे ठरले आहे.

खासगी बसचा अपघात : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीत शनिवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास साखर झोपेत असताना खासगी बसचा अपघात झाला. ज्यात गोरेगावच्या वीर बाजीप्रभू ढोल-ताशा पथकाची स्थापना करणारे गोरेगाव येथील संतोष नगरमधील दोघे भाऊ असलेल्या सतीश धुमाळ (वय 20 वर्ष) आणि स्वप्निल धुमाळ (वय 18 वर्ष) देखील मृत्युमुखी पडले आहेत.

हेही वाचा : Raigad Bus Accident : नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली, अख्ख्या बसचा चक्काचूर; पाहा रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.