मुंबई - महाराष्ट्रात गेल्या सात महिन्यांपासून मंदिरे व तसेच सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत. कोरोना काळात मानसिकदृष्या खचलेल्या भक्तांना आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घ्यायचे आहे. राज्यात सर्व व्यवहार सुरु केले असून मंदिरे मात्र बंद आहेत. वारंवार मंदिर उघडण्याची सर्व राजकीय व धार्मिक संघटनांनाी मागणी करून देखील मंदिरे खुली न झाल्याने 24 ऑक्टोबर रोजी विश्व हिंदू परिषद राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.
...तर या उद्रेकाला सरकार जबाबदार असेल- विश्व हिंदू परिषद
राज्यात रेल्वे, जिम, पब, मॉल मद्यकेंद्रे सर्व सुरू आहे. मग ज्या ठिकाणी शांतता असते ते धार्मिक स्थळ बंद का, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेने करत सरकारने लवकरात लवकर मंदिरे सुरू करावी, अन्यथा त्यानंतर होणाऱ्या उद्रेकाला सरकार जबाबदार असेल, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.