मुंबई : विलेपार्ले येथे आज सकाळी सिलेंडर स्फोटामुळे ५ जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आज पुन्हा याच विभागात आग लागली आहे. विलेपार्ले पूर्व येथील पश्चिम दृत गती मार्गावर अंधेरी पार्ले पुलाखाली सहारा हॉटेल (near Sahara Hotel) येथे उभी असलेली ४० ते ४५ वाहने आगीत (vehicles gutted in Vileparle fire Incident) जळून राख झाली आहेत. यात भंगाराच्या आणि आरटीओने पकडलेल्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
भंगाराच्या वाहनांना आग : विलेपार्ले पूर्व पश्चिम दृत गती मार्गावर, अंधेरी पार्ले पुलाखाली सहारा हॉटेल येथे वाहने पार्क केली जातात. आरटीओ पोलिसांनी पकडलेली वाहने सुद्धा याच ठिकाणी पार्क केली जातात. आज सायंकाळी ४.१७ मिनिटांनी ही या वाहनांना आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग विजवली. मात्र या आगीत भंगार सामान असलेल्या २० ते २५ रिक्षा तसेच आरटीओ पोलिसांनी पकडलेल्या १५ ते २० गाड्या जळून खाक झाल्या आहेत. भंगाराच्या सामानामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत अद्याप कोणीही जखमी झालेले नाही.