मुंबई - शिवसेनेत दुफळी निर्माण झाली असली तरी दोन्ही गटाचे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर व्यक्त करतात. बाळासाहेब ठाकरेंची आज पुण्यतिथी असताना शिंदे गटाचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करणारे ट्विट केले आहे.
आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले, की हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले, की साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात... वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख स्वर्गीय #बाळासाहेब_ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी अभिवादन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, माजी छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.
छगन भुजबळ यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मार्मिक च्या माध्यमातुन बाळासाहेब गैरमराठी लोकांच्या मुंबईतील आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील वाढत्या लोकसंख्येच्या विरोधात भाष्य करीत असत.बाळासाहेबांच्या राजनैतिक सिध्दांतांमधे त्यांच्या वडिलांचा फार मोठा हात होता.महाराष्ट्राच्या विभाजनाचा त्यांनी प्रखर विरोध केला होता.
शरद पवारांनी ट्विटमध्ये म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत, वाणीत आणि कुंचल्यात राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखडपणे भाष्य करण्याचे सामर्थ्य होते. जनमानसांमध्ये मराठी अस्मिता जागवणारे, मराठी माणसांच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृति दिनी विनम्र अभिवादन!
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत अभिवादन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की हे नाते खुप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है.. साहेब.. विनम्र अभिवादन ! जय महाराष्ट्र!
शिवसेनेत दुफळी निर्माण झाली असली तरी दोन्ही गटाचे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर व्यक्त करतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त (Balasaheb Thackeray death Anniversary ) शिवतीर्थावर मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी रीघ लावली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येथे जमले (clashes between Shinde group and Thackeray group) होते.
शिवतीर्थावर गोमूत्र शिंपडले : मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde group) यांनी आपल्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. शिंदे आपल्या आमदारांबरोबर शिवतीर्थावर दाखल झाले होते. त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले होते. यानंतर ते आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. पण शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह शिवतीर्थावरुन निघाल्यानंतर लगेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले होते. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले होते. एकनाथ शिंदे शिवतीर्थावरुन निघून गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले (Uddhav Thackeray group) होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची जागा शुद्ध करण्यासाठी शिवतीर्थावर गोमूत्र शिंपडले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.
बाळासाहेंबाच्या विचाराची मशाल निष्ठावंताच्या हातात : बाळासाहेंबाच्या विचाराची मशाल ही केवळ निष्ठावंताच्या हातात असणार आहे. त्यांनी निष्ठा आणि अस्मितेला तेज प्राप्त करून दिले, असे मत शिवसेना नेता संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांना जाऊन १० वर्षे जाऊन झाले. आज त्यांच्या नावाने ढोंग सुरू ( Sanjay Raut slammed BJP ) आहे. हे ढोंग चालणार नाही, त्याला लाथ मारुन पुढे चालले पाहिजे. बाळासाहेबांचे वारसदार सांगून जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार सावंत यांची प्रतिक्रिया - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Shiv Sena chief Balasaheb Thackeray यांचा आज स्मृतिदिन Balasaheb Thackeray Commemoration Day आहे. अरविंद सावंत Arvind Sawant बाळासाहेबांच्या आठवणीने गहिवरले. बाळासाहेब तुम्ही जिथे असाल तिथे निश्चित राहा आम्ही सर्व उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत. बाळासाहेब असते तर निष्ठा म्हणणाऱ्यांना वाणी आणि (चप्पल) मारले असते. निष्ठा म्हणाऱ्यांनी त्याबद्दल काही बोलू नये.