ETV Bharat / state

Varavara Rao : मोतींबिदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याच्या परवानगीकरिता वरावरा राव यांची उच्च न्यायालयात धाव

author img

By

Published : Jan 6, 2023, 9:09 AM IST

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी ज्येष्ठ तेलगू कवी वरावरा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली (Varavara Rao moves High Court ) आहे. मोतींबिदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. वरावरा राव यांचा यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष यांना हे कोर्टाने परवानगीचा अर्ज फेटल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ( High Court for permission to go to Hyderabad ) या अर्जावर न्यायमूर्ती आर. जी अवचट यांच्यासमोर सुनावणी झाली.

Varavara Rao moves
वरावरा राव यांची उच्च न्यायालयात धाव

मुंबई : या प्रकरणातील आरोपी ज्येष्ठ तेलगू कवी वरावरा राव यांना साल 2018 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर मार्च 2021 पर्यंत ते न्यायालयीन कोठडीत होते. (cataracts surgery) त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने साल 2022 मध्ये त्यांना वैद्यकीय कारणास्तव अटीशर्तीसह जामीन मंजूर केला होता. ( High Court for permission to go to Hyderabad) या आदेशातील अटीनुसार राव यांना मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाचे अधिकारक्षेत्र सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये राव यांनी मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात मोतीबिदूच्या शस्त्रक्रियेसाठी तीन महिने हैदराबादमध्ये राहण्याची परवानगी मागणार अर्ज दाखल केला होता. (Varavara Rao moves High Court ) मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाला राव यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती आर.जी अवचट यांच्यासमोर सुनावणी झाली.

सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट : मुंबईत ही शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार महागडे आहेत. आपण तेलंगणा येथील निवृत्तीवेतन धारक जेष्ठ नागरीक असल्याने तिथे माफक दरात वैद्यकीय सेवेस पात्र आहेत. असा दावा राव यांनी या याचिकेतून केला आहे. तसेच मुंबईतील सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून आपल्याला तात्पुरता जामीन देताना हीच बाब विचारात घेण्यात आली असल्याचेही राव यांनी या याचिकेत नमूद केलेले आहे. याशिवाय 6 मार्च 2021 पासून आपण जामीनातील कोणत्याही अटीशर्तींचे उल्लंघन केलेले नसल्याचेही त्यांनी याचिकेत अधोरेखित केले आहे. ( Hyderabad for cataracts surgery )

काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण ? पेशव्यांचे मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केलं होतं. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदे तील वक्तव्यं कारणीभूत होती, अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदे मागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.