ETV Bharat / state

Tunisha Sharma Suicide Case :....तर तुनिषाचा जीव वाचला असता; आईचा शीझानवर आणखी एक आरोप

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी (Tunisha Sharma Suicide Case) तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी आरोपी शीझान खानवर आणखी एक आरोप (Vanita Sharma alleged on Sheezan Khan) केला आहे. त्या म्हणाले की, तुनिषाची हत्या झाली आहे का? याबाबत तपास सुरू आहे. पण आत्महत्या केल्यानंतर शीझानने तुनिषाला सेटजवळील रुग्णालयात दाखल केले असते तर आज तुनिषाचा जीव वाचला असता. मात्र, तिला दूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुनिषाच्या आईने आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आरोप केले आहे.

Tunisha Sharma Suicide Case
वनिता शर्मा
author img

By

Published : Jan 8, 2023, 6:07 PM IST

Updated : Jan 8, 2023, 7:52 PM IST

वनिता शर्मा बोलताना

मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असताना तनुषाच्या आईने व शीझान खानच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप केले आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी शीझान खानवर आणखी आरोप (Vanita Sharma alleged on Sheezan Khan) केले आहेत. ते म्हणाले की, तुनिषाची हत्या किंवा आत्महत्या झाली आहे. कारण शीझान खान याने तुनिषाला मालिकेच्या सेटपासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या इस्पिताळात न घेवून जाता त्याने दुरच्या इस्पिताळात घेऊन गेला. तिने आत्महत्या केली तेव्हा ती श्वास घेत होती, तिला वाचवता आले असते. मग शीझानने तिला जवळच्या इस्पिताळात का घेऊन गेला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (Tunisha Sharma Suicide Case )

तुनिषाचा व्हाईस मॅसेज ऐकवला : 21 डिसेंबरपासून तुनिषा तिच्या आईला वनिता शर्मा यांना व्हॉइस मेसेज करत होती. त्यांनी तुनिषा शर्माचा व्हाईस मॅसेज देखील ऐकवला आहे. त्यावरून वनिता शर्मा म्हणाल्या की, "आमचे खूप चांगले नाते होते. शीझानची आई मला तुनिषासोबतच्या नात्याबद्दल सांगू शकत नाही. मला कोणाला समजावून सांगण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

शीझान ड्रग्स घेत होता? : वनिता शर्मा यांनी शीझानवर आरोप (Vanita Sharma alleged on Sheezan Khan) करत म्हणाले की, "मी तुनिषाला 3 महिन्यांत 3 लाख रुपये पाठवले. तिच्याकडे पैशांची कमतरता नव्हती आणि तिच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. तिने नंतर मित्रांकडून पैसे घेतले. कदाचित शीझान ड्रग्ज घेतले आणि ती सवय तो तुनिषावर तिच्यावर लादत होता. त्याची कार बिघडली आणि त्याने माझी कार महिनाभर वापरली, असा आरोप त्यांनी केला आहे.

पुढील सुनावणी 9 जानेवारीला : तुनिषा शर्मा तिच्या चालू असलेल्या टीव्ही शो 'अलिबाबा - दास्तान-ए-काबुल' च्या सेटवर 24 डिसेंबर रोजी मृतावस्थेत आढळून (Tunisha Suicide Case) आली होती. शोमधील सहकलाकार शीझान खान याला तुनिषाच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. शीझानने तुनिषाची फसवणूक केल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. तुनिषाच्या आईच्या आरोपावरून एफआयआर नोंदवून शीझानला अटक करण्यात आली. वसई न्यायालयाने 31 डिसेंबर रोजी शीझान खानची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. वसई सत्र न्यायालयाने शनिवारी अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणातील आरोपी टेलिव्हिजन अभिनेता शीझान खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी 9 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जानेवारी रोजी होणार आहे.

Last Updated : Jan 8, 2023, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.