मुंबई : भारतात वंदे भारत एक्सप्रेसच्या यशस्वी कामगिरीची चर्चा सुरु आहे. पूर्णत: स्वदेशी बनावटीची ही ट्रेन अल्पकाळातच प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे. भविष्यात वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर लवकरच मोठ्या शहरांत वंदे मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली आहे.
वंदे भारत ट्रेन प्रमाणे वंदे मेट्रो : सध्या देशात 18 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्या धर्तीवरच आता रेल्वे मंत्रालयाचा वंदे मेट्रो ट्रेन सुरू करण्याचा मानस आहे. वंदे भारत ट्रेन ही लांब पल्ल्यासाठी सुरू करण्यात आली आहे. तर वंदे मेट्रो शहराअंतर्गत प्रवासासाठी उपयोगी पडणार आहे. एसी लोकल प्रमाणेच वंदे मेट्रोही पूर्णत: वातानुकूलित असणार आहे. पहिली वंदे मेट्रो एमआरव्हीसी ऑर्गनायझेशन, रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईत सुरु होणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी ही माहिती दिली आहे.
पूर्णपणे भारतीय बनावटीची मेट्रो : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी याविषयी सेंट्रल रेल्वेच्या ट्विटर अकॉउंटवर माहिती दिली होती. ते म्हणाले की, देशातील वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर केंद्र सरकार वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु करणार आहे. वंदे भारत मेट्रो मध्ये इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर केला जाणार आहे. ही मेट्रो पूर्णपणे भारतीय बनावटीची असेल. तिचा वेग ताशी 160 किलोमीटर राहील.
वर्षाअखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा : विशेष म्हणजे या वर्षा अखेरीस वंदे मेट्रो पूर्णपणे तयार होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार देशातील महानगरातल्या चाकरमान्यांना खुश करण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरवातीलाच वंदे मेट्रोचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता वंदे मेट्रो मुंबई शहरात कधी धावेल, याचीच सर्वांना उत्सुकता आहे.
हेही वाचा :
- Mumbai Goa Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्याऐवजी फक्त्त ८ डब्याची चालणार, 'या' तारखेला होणार मान्सून वेळापत्रक लागू
- Vande Bharat Train: मडगाव-मुंबई वंदे भारत ट्रेन लोकार्पणापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात; काय आहे वाद?
- Vande Bharat Train : मुंबई ते गोवा दरम्यान धावणार राज्यातील पाचवी वंदे भारत ट्रेन, जाणून घ्या सविस्तर