ETV Bharat / state

विकास कामे करून घेण्यासाठी भाजपमध्ये जातोय - वैभव पिचड - विकास कामे व्हावीत यासाठी मी भाजपात

मागील पाच वर्षात माझ्या मतदारसंघात अनेक विकास कामे रखडली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपासून माझ्या कार्यकर्त्यांमध्ये यासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात होती. म्हणूनच ही विकास कामे व्हावीत यासाठी मी भाजपात प्रवेश करत आहे.

विकास कामे करून घेण्यासाठी भाजपामध्ये जातोय - वैभव पिचड
author img

By

Published : Jul 30, 2019, 3:44 PM IST

मुंबई - राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहेत. यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या महत्वाच्या पक्षातील आजी-माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार वैभव पिचड यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. मागील पाच वर्षात माझ्या मतदारसंघात अनेक विकास कामे रखडली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपासून माझ्या कार्यकर्त्यांमध्ये यासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात होती. म्हणूनच ही विकास कामे व्हावीत यासाठी मी भाजपात प्रवेश करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोलाचे उमेदवार वैभव पिचड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

विकास कामे करून घेण्यासाठी भाजपामध्ये जातोय - वैभव पिचड

वैभव पिचड यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना आपल्या मतदारसंघात विकास कामे रखडल्याने आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे सांगितले. मागील पाच वर्षात आपल्या मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आदी विकास कामासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपासून कार्यकर्त्यांपर्यंत माझ्यावर एक दबाव निर्माण झाला होता. सत्तेत जाऊनच आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवावेत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते आणि त्यामुळेच मी हा निर्णय घेतला असल्याचे पिचड यांनी सांगितले.

दुसरीकडे राज्यातील आदिवासींच्या वन जमिनीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, वनजमिनीचे पट्टे धारक आहेत त्यांचे नाव मूळ उताऱ्यावर लावले जावे यासाठी मी आग्रही आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ट्रायबल ऍडव्हायझरी कमिटीत यासंदर्भात निर्णय झाला होता, परंतु त्यासंदर्भात अजूनही आदिवासींच्या या जमिनीच्या मूळ उताऱ्यावर त्यांच्या नावे लावली जात नाहीत. त्यामुळे त्यांना इतर कोणत्याही सवलती मिळत नाहीत. त्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. मी पक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकून आलोय आणि ते मला पुन्हा माझ्याच मतदारसंघात संधी देतील असे ते म्हणाले.

Intro:विकास कामे करून घेण्यासाठी भाजपामध्ये जातोय - वैभव पिचड

Slug :
mh-mum-mla-vaibhavpichad-bjp-admi-121-7201153

मुंबई, ता. 30 :

मागील पाच वर्षात माझ्या मतदारसंघात अनेक विकास कामे रखडली होती त्यामुळे सर्वसामान्य जनतेपासून माझ्या कार्यकर्त्यांमध्ये यासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात होती. म्हणूनच ही विकास कामे व्हावीत यासाठी मी भाजपात प्रवेश करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोलाचे उमेदवार वैभव पिचड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

वैभव पिचड यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना आपल्या मतदारसंघात विकास कामे रखडल्याने आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे सांगितले. मागील पाच वर्षात आपल्या मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आदी विकास कामासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपासून कार्यकर्त्यांपर्यंत माझ्यावर एक दबाव निर्माण झाला होता. सत्तेत जाऊनच आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवावेत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते आणि त्यामुळेच मी हा निर्णय घेतला असल्याचे पिचड यांनी सांगितले.
दुसरीकडे राज्यातील आदिवासींच्या वन जमिनीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, वनजमिनीचे पट्टे धारक आहेत त्यांचे नाव मूळ उताऱ्यावर लावले जावे यासाठी मी आग्रही आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ट्रायबल ऍडव्हायझरी कमिटीत यासंदर्भात निर्णय झाला होता परंतु त्यासंदर्भात अजूनही आदिवासींच्या या जमिनीच्या उतारावर मूळ उताऱ्यावर त्यांच्या नावे लावली जात नाहीत. त्यामुळे त्यांना इतर कोणत्याही सवलती मिळत नाहीत त्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. मी पक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकून आलोय आणि ते मला पुन्हा यास माझ्याच मतदारसंघात संधी देतील असे ते म्हणाले.

Body:विकास कामे करून घेण्यासाठी भाजपामध्ये जातोय - वैभव पिचड

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.