मुंबई - कोरोना विषाणूची लागण होऊ नये, विषाणूपासून संरक्षण व्हावे म्हणून 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. त्याअनुषंगाने राज्यात आज 53 हजार 712 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 11 लाख 40 हजार 820 लाभार्थ्यांना ही लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
राज्यात आज 806 केंद्रांवर 53 हजार 712 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 28,280 लाभार्थ्यांना पहिला तर 25,432 लाभार्थ्यांना दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 7 हजार 693 आरोग्य आणि 20 हजार 587 फ्रंट लाईन वर्कर लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 25 हजार 432 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 52 हजार 671 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीद्वारे लसीकरण करण्यात आले. 1041 लाभार्थ्यांना को-वॅक्सिन ही लस देण्यात आली. आजपर्यंत 11 लाख 40 हजार 820 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
जिल्हानिहाय आकडेवारी -
अहमदनगर 38809
अकोला 13597
अमरावती 24744
औरंगाबाद 28227
बीड 21891
भंडारा 13697
बुलढाणा 18287
चंद्रपूर 23209
धुळे 14322
गडचिरोली 14293
गोंदिया 14399
हिंगोली 7913
जळगांव 25751
जालना 16444
कोल्हापूर 34116
लातूर 20308
मुंबई 203444
नागपूर 53632
नांदेड 16838
नंदुरबार 16783
नाशिक 50820
उस्मानाबाद 12243
पालघर 28542
परभणी 9325
पुणे 115235
रायगड 17830
रत्नागिरी 17193
सांगली 27606
सातारा 43735
सिंधुदुर्ग 10022
सोलापूर 36306
ठाणे 102775
वर्धा 20701
वाशीम 8455
यवतमाळ 19328
एकूण 11,40,820