मुंबई - 1 मे पासून देशभरात 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत 5 लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील 2 हजार 531 लाभार्थ्यांना काल लस देण्यात आली. ज्यांना कोविन अॅपवरून मेसेज आला त्यांनाच 5 लसीकरण केंद्रांवर लस देण्यात आली. आजही या वयोगटातील लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 24 लाख 56 हजार 672 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा - घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये 20 वर्षीय तरूणाची जुन्या वादातून 7 जणांकडून हत्या
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत काल 2 हजार 531 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 2 हजार 468 लाभार्थ्यांना पहिला, तर 63 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 24 लाख 56 हजार 672 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 19 लाख 65 हजार 622 लाभार्थ्यांना पहिला, तर 4 लाख 91 हजार 50 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 83 हजार 723 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 27 हजार 209 फ्रंटलाईन वर्कर, 9 लाख 80 हजार 136 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या 8 लाख 62 हजार 185, तर 18 ते 44 वर्षांमधील 3 हजार 419 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू
मुंबईत रोज 30 ते 50 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात होते, यामुळे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लसीचा तुटवडा असल्याने रविवारपर्यंत तीन दिवस लसीकरण बंद ठेवले गेले. तसेच, वॉक इन लसीकरण बंद करण्यात आले. जो काही लसीचा साठा बाकी आहे त्यात 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना 5 लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. आजही प्रत्येक केंद्रांवर 500 लाभार्थ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लसीकरण मोहीम
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध, तसेच 45 ते 59 वर्षांमधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. काल 1 मे पासून 18 ते 45 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,83,723
फ्रंटलाईन वर्कर - 3,27,209
जेष्ठ नागरिक - 9,80,136
45 ते 59 वय - 8,62,185
18 तर 44 वय - 3419
एकूण - 24,56,672
हेही वाचा - 'पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत आमचा थोडक्यात पराभव'