मुंबई: मुंबईत मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, वयोवृद्ध नागरिक, ४५ वर्षावरील आजार असलेले नागरिक, १८ वर्षावरील नागरिक, १५ ते १७ वयोगटातील मुले, १२ ते १४ वयोगटातील लहान मुले असे टप्प्याटप्याने लसीकरण केले गेले. मुंबईत आतापर्यंत एकूण २ कोटी ५ लाख ६३ हजार १४० डोस देण्यात आले आहेत. त्यात १ कोटी ६ लाख ७२ हजार ७४८ लसीचे पहिला डोस, ९४ लाख ८२ हजार ३९३ लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच ४ लाख ७ हजार ९९९ बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
हेही वाचा : Shipping Record : पहिल्यांदाच जलमार्गाने 51 दशलक्ष टन मालवाहतूक; सागरी महामंडळाचा विक्रम