मुंबई - 14 वर्षीय विद्यार्थ्याने मुंबईत आत्महत्या केली आहे. अंधेरी येथील मरोळ येथे असलेल्या वसंत ओएसिस कॉम्प्लेक्समध्ये या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. मृत हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी असून, तो अमेरिकेत राहत होता आणि फक्त सुट्टीसाठी मुंबईथ आला होता.
कुटुंब सुट्टीसाठी आले होते : शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता ही बाब सर्वप्रथम मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मुलाला रुग्णालयात पाठवण्यात आले, पण पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
सीसीटीव्ही तपासले - काही तासांनंतर, पोलिसांनी कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष आणि सचिव यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्याचवेळी कॉम्प्लेक्स आणि जवळपासच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. मृत विद्यार्थ्याला कोणीही ओळखले नाही, याचे कारण म्हणजे मुलगा आणि त्याचे कुटुंब अमेरिकेत राहत होते आणि ते मुंबईत अधूनमधून भेट देतात. परदेशात उन्हाळ्याची सुट्टी पडल्याने हे कुटुंब मे महिन्याच्या अखेरीपासून अंधेरी येथे राहत होते, असे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय, मृतदेह इमारती क्रमांक 17 मध्ये सापडला होता तर मृत व्यक्ती त्याच्या मागच्या इमारतीत राहत होती, असे पोलीस पुढे म्हणाले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या त्याच्या शेवटच्या हालचालींनुसार, तो मागच्या गेटमधून इमारती क्रमांक 17 मध्ये शिरला. लिफ्टमध्ये चढला आणि टेरेसवर पोहोचला जिथून तो खाली उडी मारताना दिसला. अधिकाऱयाने सांगितले की, तो सीसीटीव्हीमध्ये एकटाच होता त्यामुळे त्याला मुद्दाम ढकलले गेले नाही.
मुलाचा मोबाईल तपासला - तपासादरम्यान असे समोर आले की, त्याचे वडील सध्या अमेरिकेत आहेत, तर आई आणि बहीण मुंबईत आहेत. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यामध्ये कोणतेही असामान्य वर्तन आढळून आले नाही. तथापि, तपासाचा एक भाग म्हणून मुलाचा मोबाइल फोन तपासला असता, त्यांना एक चॅट बॉक्स सापडला जिथे तो एका मैत्रिणीशी बोलत होता, ती देखील यूएसएमध्ये आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील हे चॅट्स आहेत. या मेसेजच्या सुरुवातीला संभाषणात आत्महत्या, नैराश्य इत्यादी विषयांवर चर्चा झाली होती.
अपघाती मृत्यू म्हणून नोंद - शनिवारी सकाळी आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, 22 व्या मजल्यावरून उडी मारल्याने मुलाच्या कवटीला आणि बरगड्याला जोरदार मार बसला होता. पोलिसांना तसेच मुलाच्या कुटुंबीयांना कोणावर संशय नाही असे सांगितले म्हणून हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -