ETV Bharat / state

उर्मिला मातोंडकर या केवळ लोकसभा निवडणुकीपुरत्या काँग्रेसमध्ये आल्या होत्या - एकनाथ गायकवाड

मातोंडकर या शिवसेनेच्या माध्यमातून विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून जाण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर त्यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. या पक्षप्रवेशावर काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली.

urmila matondkar  joined congress  only for lok sabha said eknath gayakwad
ऊर्मिला मातोंडकर या केवळ लोकसभेचे पुरत्या काँग्रेसमध्ये आल्या होत्या - एकनाथ गायकवाड
author img

By

Published : Nov 30, 2020, 5:43 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या काँग्रेसमध्ये केवळ लोकसभा निवडणुकीपुरत्या आल्या होत्या. निवडणूक संपल्यानंतर त्या काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमात सक्रिय झाल्या नाहीत आणि त्यांनी तेव्हाच काँग्रेस सोडली. यामुळे आता त्या कोणत्या पक्षात जात आहेत, याबद्दल आम्हाला काहीही देणेघेणे नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.

एकनाथ गायकवाड यांची प्रतिक्रिया

मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना आम्ही लोकसभेची उमेदवारी दिली होती. परंतु या निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये कोणतेही योगदान दिले नाही. शिवाय त्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे आता त्या इतर पक्षात जात असतील, तर त्यावर आम्हाला काहीही वाटत वाटणार नाही. उलट त्यांना आमच्या पक्षात मोकळेपणाने काम करण्याची संधी आम्ही दिली होती. ही संधी त्यांनी गमावली असल्याचे एकनाथ गायकवाड म्हटले. काँग्रेस हा असा पक्ष आहे, ज्या पक्षात लोकशाही रुजलेली आहे. त्यामुळे या पक्षात सर्वांनाच मोकळेपणाने काम करण्याची संधी मिळते, असेही गायकवाड यांनी सांगितले.

उर्मिला मातोंडकर या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसमध्ये त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये असलेल्या दुफळीमुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे मातोंडकर यांनी या निवडणुकीनंतर काँग्रेसला रामराम ठोकत काँग्रेस सोडली होती. मातोंडकर या शिवसेनेच्या माध्यमातून विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून जाण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर त्यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश होत आहे.

हेही वाचा - स्मरण दिन : 'केमिकल वॉर' म्हणजे काय? जगभरातील युद्ध पीडितांचं स्मरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.