मुंबई - 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरने काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला आहे. तिच्या भाषणातून विरोधकांनी तिला चांगलेच फैलावर घेतले आहे. तरीही टीकांकडे लक्ष न देता उर्मिलाने आठवडाभर सकाळ संध्याकाळ सभा, भेटी-गाठींचा सपाटा लावला होता. मात्र, त्यामुळे तिला उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे तिने सकाळच्या वेळचे प्रचार दौरे बंद केल्याचे बोलले जात आहे.
उमेदवारी जाहीर होताच पहिल्याच दिवशी तिने उत्तर मुंबईतील बोरिवली विधानसभेत पहिले भाषण केले होते. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. 'आता उन्हाळा सुरू आहे, कोणाला वाटत असेल मी या उन्हात वितळून जाईल, तर तसे काही होणार नाही', असे उर्मिलाने म्हटले होते. त्यानंतर आठवडाभर उर्मिलाने सकाळ संध्याकाळ कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या चौकाचौकात भेटी घेण्याचा सपाटा लावला. मात्र, त्यानंतर तिला दोनदा उन्हाचा त्रास झाल्याचे समजले. त्यानंतर उर्मिलाने गेल्या आठवड्यापासून सकाळच्या वेळी सभा घेणे बंद केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पाडव्याच्या दिवशीही उर्मिला ठराविक शोभायात्रेत ५ ते १० मिनिटे सहभागी झाली. यावरून उर्मिलाला तिच्याच वाक्यांचा विसर पडला की काय, अशी चर्चा विरोधकांमध्ये सुरू आहे.