मुंबई - चीनने कोरोना महामारीबद्दल जगाला अनभिज्ञ ठेवून धोका दिला. कोरोना साथीचा संसर्ग जगभर वाढण्यास चीनच जबाबदार आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार होत होता तेव्हाच चीनने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद करायला हवे होते. मात्र, चीनने कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे जगाने बहिष्कार घालून चीनला धडा शिकवला पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
चीनच्या वुहानमधून कोविड-19 हा विषाणू जगभर पसरला. यामूळे संपूर्ण जगात 3 लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पहिल्या दुसऱ्या महायुद्धानंतर आता कोरोनाचे तिसरे जागतिक महायुद्ध सुरू असून यात जगातील 190 देश भरडले जात आहेत. जगावर कोरोनाचे संकट लादण्यास सर्वथा चीन जबाबदार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवर बहिष्कार घातला पाहिजे. भारतातसह संपूर्ण जगाने चीनने उत्पादित केलेल्या वस्तू वापरने बंद केले पाहिजे असे आठवले म्हणाले.