ETV Bharat / state

Amit Shah in Mumbai : अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यापासून चंद्रकांत पाटील दूरच; 'हे' आहे कारण - Amit Shah Mumbai visit

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुपस्थिती. पाटील हे अमित शाह यांच्या भेटीला आले नाहीत. अमित शाह यांचे निकटवर्तीय असलेले चंद्रकांत पाटील यांच्यावर सध्या भाजप नेतृत्व नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Amit Shah Mumbai Visit
Amit Shah Mumbai Visit
author img

By

Published : Apr 16, 2023, 3:38 PM IST

Updated : Apr 16, 2023, 4:09 PM IST

मुंबई : अमित शाह मुंबई दौऱ्यावर आलेले असताना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील हे या दौऱ्यापासून दूरच राहिले. अमित शाह यांचे शनिवारी मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी सह्याद्री या अतिगृहात बैठकांचे सत्र घेतले. या बैठकीलासुद्धा चंद्रकांत पाटील फिरकले नाहीत. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात असताना या दौऱ्यापासून चंद्रकांत पाटील लांब राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

चंद्रकांत पाटील यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय : वास्तविक चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यावरून केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले होते. अशातच आता चंद्रकांत पाटील यांची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय ठरली आहे. पक्ष नेतृत्वापासून त्यांना दूर सारले तर जात नाही ना? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री यांनी अमित शहा यांचा उल्लेख करत जेव्हा जेव्हा अमित भाईंना भेटतो, तेव्हा काम करण्याची प्रेरणा, जिद्द, ताकद त्यांच्याकडून भेटते, असे सांगितले. अशा परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांची अनुपस्थिती ही या दौऱ्या दरम्यान प्रकर्षाने जाणवली.

पाटील कोल्हापूर दौऱ्यावर : चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर त्यांची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जवळीक ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली होती. परंतु चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सध्या अमित शहा यांच्या सहीत पक्षातील वरिष्ठ नेते सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याने चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरच्या पूर्वनियोजित दौऱ्यावर असल्याचे निमित्त सांगून अमित शहा यांच्या बैठकीपासून दूरच राहिले.

काय म्हणाले होते, चंद्रकांत पाटील? : बाबरी मशीद पाडण्यात आली त्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होत. जेव्हा ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता, असे पाटील म्हणाले होते. तसेच अयोध्येमध्ये कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने त्यांना तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यामध्ये सहभाग घेतलेले लोक हे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद किंवा दुर्गा वाहिनीचे असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

हेही वाचा - Atiq Murder Case : अतिक-अश्रफ हत्याकांड करणारे आरोपी कोण आहेत? हत्येचे सांगितले धक्कादायक कारण

Last Updated : Apr 16, 2023, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.