ETV Bharat / state

Nirmala Sitharaman on PM Modi : मोदी कार्यकाळात ९ नव्हे तर ६ वर्षांतच देशाची प्रगती- निर्मला सितारामन - पीएम मोदी कार्यकाळ आढवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भाजपकडून केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांची मुंबईत एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ९ वर्षांत नाही तर ६ वर्षांत प्रगती केली, असे उद्‌गार सितारामन यांनी काढले. तसेच मोदी सरकारने देशाला काय दिले, याचा लेखाजोखाही त्यांनी मांडला.

Nirmala Sitharaman PC Mumbai
निर्मला सितारामन
author img

By

Published : May 29, 2023, 6:37 PM IST

मोदी कार्यकाळातील प्रगतीचा आढावा देताना निर्मला सितारामन

मुंबई: निर्मला सितारामन म्हणाल्या की, मोदी सरकारला ९ वर्षे झाली असली तरीसुद्धा ही प्रगती फक्त ६ वर्षांमध्ये झालेली आहे. त्यांनी जनतेला काही वचन दिले होते. त्याची पूर्तता मोदी सरकारने केलेली आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत केंद्रातील योजना पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. म्हणूनच त्यांची काम करण्याची पद्धत जनतेला फार आवडत आहे. २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर वित्तमंत्र्यांनी सांगितले आहे की, हा 'आरबीआय'चा निर्णय आहे. 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.

पंतप्रधान मोदींच्या कार्यप्रगतीविषयी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

कॉंग्रेसवर निशाना: प्रत्येक निवडणूक ही पक्षासाठी महत्त्वाची असते. जनतेच्या हिताचे प्रश्न लक्षात घेऊन त्या पद्धतीने पक्ष आपली रणनीती बनवत असतात. परंतु, या सर्व बाबतीत मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस फक्त बोलत आहे. ते कुठल्याही गोष्टी वास्तविकतेमध्ये आणत नाहीत. प्रश्न उपस्थित करणे हे विरोधकांचे काम आहे. परंतु, काँग्रेसने त्यांच्या पक्षावर लक्ष देणे जास्त गरजेचे असल्याचेही निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी? शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट केले जाणार, असे वचन मोदी सरकारने दिले होते. यावर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या की, शेतकऱ्यांचे उत्पन्न रातोरात दुप्पट होणार नाही. शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. मध्यंतरी शेतकऱ्यांना हवे ते भेटले नाही; पण विविध पद्धतीने सरकार त्यांना मदत करत आहे. संपूर्ण जगात मध उत्पादनात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. दूध उत्पादन, केळी उत्पादन, गहू उत्पादन, भात उत्पादन या सर्वांमध्येसुद्धा आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नसले तरीसुद्धा त्यांच्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहेत. शेतकऱ्यांच्या विजेचा खर्चसुद्धा कमी झालेला आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकार काहीच करत नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही निर्मला सितारामन यांनी सांगितले.

'या' योजनांचा जनतेला लाभ: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २५ लाख घरे, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत ७१ लाख गरिबांना लाभ, कोविड काळात १७.७८ कोटी मोफत लसीकरण, पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत १.१० कोटी शेतकऱ्यांना लाभ, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १ कोटी ११ लाख ७४ हजार ८५८ घरांमध्ये नळ दिले गेले आहेत. पीएम उज्वला योजनेअंतर्गत ३८ लाख ९० हजार भगिनींना लाभ झाला आहे. कौशल विकास योजनेअंतर्गत १० लाख २७ हजार युवकांना फायदा झाला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत ८७.८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत ५ लाख पदपथ व्यावसायिकांना लाभ दिला गेला आहे.

'ती' कामे फक्त ९ वर्षांत: मुद्रा योजनेचा ४१ लाख युवकांनी लाभ घेतला आहे. अटल पेन्शन योजनेचा ४० लाख लोकांना लाभ झाला आहे. सुकन्या समृद्धी योजनेचे २३.१३ लाख लाभान्वित आहेत. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनचे ५०,६०० लाभान्वित आहेत. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत ३२.२५ लाख लाभान्वित असून केंद्राच्या मदतीने पायाभूत सुविधांची कामे ४ लाख कोटी रुपयांहून अधिक कामे सुरू आहेत. मागील २० वर्षांत झाली नाही ती कामे या ९ वर्षांत केली असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा:

  1. Sai Resort Case : नाक घासून माफी मागावीच लागेल; अनिल परब यांच्याकडून सोमय्यांचा समाचार
  2. Sai Resort Case : साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधातली याचिका मागे, किरीट सोमय्या यांचा निर्णय
  3. Rs 2000 Note Withdrawal: 2 हजारांच्या नोटेने सोने बाजारपेठेची होतेय 'चांदी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.