मुंबई: राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या मागणीवरुन चांगलाच वाद पेटला आहे. आरोप प्रत्यारोपांसह कलगीतुरा पहायला मिळत आहे. यातच राज ठाकरे यांनी सरकारला 3 तारखे पर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बैठका घेत मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. मात्र हा वाद शमलेला नाही यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी तेथील मशिदीवरचे भोंगे उतरवले आहेत. या बद्दल राज ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.
राज ठाकरे यांनी ट्विट मधे म्हणले आहे 'उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना'
-
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022