मुंबई - राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे बळीराजावर मोठे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांना दिलासा व मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेने यापूर्वीच मराठवाडा, कोकणात दुष्काळी भागात पाहणी केली होती. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 15 नोव्हेंबरला सातारा व सांगली जिल्ह्यात दुष्काळी गावांना भेट देऊन पाहणी करणार असल्याचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हे वाचलं का? - 'महाराष्ट्राच्या जनतेचे नुकसान आमच्यामुळे नाही; शिवसेनेने निवडणुकीनंतर मागण्या वाढवल्या'
राज्यातील सत्ता स्थापनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मौन सोडले. शिवसेनेच्या मागण्या मान्य नसल्याचे शाह यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत पुन्हा एकदा जाणार का? याला जवळपास पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. त्यात शिवसेनेने महाशिवआघाडीला पसंती देत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत एक पाऊल पुढे टाकले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या वक्तव्यावर बोलण्यासारखं काही नाही, असे शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले. सरकार स्थापनेबाबतचे सर्व अधिकार आम्ही उद्धव ठाकरेंना दिले आहेत. त्याबाबत पूर्णपणे तेच निर्णय घेतील, असेही शिंदे म्हणाले.