ETV Bharat / state

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील पूल अचानक पडला की पाडला?; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर समृद्धी महामार्ग होऊ नये यासाठी अनेक अडथळे आणले गेल्याचा आरोप ( CM Eknath Shinde critics ) केला. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. समृद्धी महामार्गावरील पूल अचानक पूल पडला की पाडला?, असा सवाल ( Uddhav Thackeray questioned to CM Eknath Shinde ) त्यांनी केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 11, 2022, 4:35 PM IST

Updated : Dec 11, 2022, 5:05 PM IST

मुंबई: समृद्धी महामार्ग ( Samruddhi Highway ) होऊ नये यासाठी अनेक अडथळे आणले गेले, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण कार्यक्रमात करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले. जनतेच्या करातून हा महामार्ग झाला आहे. २१० किलोमीटरचा मार्ग खुला करण्यासाठी योग्य असताना अचानक पूल पडला. आता हा पूल पडला की पाडला माहित नाही, असा संशय घेत एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका ( Uddhav Thackeray questioned to CM Eknath Shinde ) केली.

उद्धव ठाकरेंची टीका: गेली 3 महिने मातोश्री असेा की शिवसेना भवन असो शिवसेनेत प्रवेश सोहळे सुरू आहेत. सत्ता असताना तर सर्व जण सोबत येत असतात, ती एक जग राहाटी असते. सत्तानारायण हा वेगळा भाग असून तो कुणाकुणाला पावतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना लगावला आहे. काही जणांना असे वाटते आहे की, शिवसेना संपली आणि या संपलेल्या काळात तुम्ही आला आहात, मात्र शिवसेना संपलेली नाही ज्यांना असे वाटत होते की आम्ही म्हणजे शिवसेना होतो, तर ती लोक संपलेली आहेत. केवळ ते जगजाहीर होणे बाकी आहे, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपला लगावला. ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरेंचा सवाल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडथळा आणल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. मात्र, तरीही आम्ही हा महामार्ग पूर्ण केल्याचे शिंदे म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार येत जात असतात, याचा अर्थ असा नाही की मी म्हणजे सगळे काही असा गैरसमज एकनाथ शिंदेंचा झाला आहे. आम्ही सत्तेत होतो तेव्हा २१० किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला होता. लोकांना हा मार्ग खुला करून देण्याची गरज असताना पूल पडला. आता पूल पडला की पाडला, या भानगडीत गेलो नाही. चौकशी समिती नेमली नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर संशयाची सुई टोचली.

राज्यपालांवर टीकास्त्र: समृद्धी महामार्गाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांचा समाचार घेतला. सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या असताना, फूले- शाहू्ू-आंबेडकर आणि शिवरायाचा महाराष्ट्र आपण म्हणतो आणि त्यांचाच़ अपमान करणारा माणूस जर पंतप्रधानांचा बाजूला बसत असेल तर महाराष्ट्राने समजायचे काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. तसेच येत्या 17 डिसेंबरला महाराष्ट्र द्रोही यांच्या विरोधातील मोर्चा काढण्यात येणार असून सगळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर वक्तव्य: महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पेटला आहे, महाराष्ट्राच्या बाजूने कुणी बोलत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री माज आल्यासारखे बोलत आहेत. आमचे मुख्यमंत्री लिहून दिले तेवढेच बोलतात, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री काही ऐकत नाही सर्व काही बुडले तरी आपण शांत आहोत. हे सगळे सुरू असताना महाराष्ट्राला कुणी वाली आहे का नाही. दोन्ही मुख्यमंत्र्यांचे नेते एकच आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री आवाज वाढवून बोलत आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत? पंतप्रधान मोदी बसवराज यांना समज देणार का.? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Last Updated : Dec 11, 2022, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.