ETV Bharat / state

Uddhav Thackeray On Ajit Pawar : अजित दादा तिजोरीच्या चाव्या पुन्हा तुमच्या हातात, जनतेच्या हिताची कामे करा - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Former Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट ( Uddhav Thackeray met Ajit Pawar ) घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले की, तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे असल्याने राज्यातील जनतेला मदत मिळेल याची मला खात्री आहे, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

Uddhav Thackeray On Ajit Pawar
Uddhav Thackeray On Ajit Pawar
author img

By

Published : Jul 19, 2023, 8:56 PM IST

मुंबई : शिवसेना (UBT) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर दोघांची ही पहिलीच भेट होती. (Uddhav Thackeray Met Ajit Pawar ) आज उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करत मोठे विधान केले आहे. अजित पवार यांच्यासोबत अडीच वर्षे काम केल्यामुळे त्यांचा स्वभाव माहीत आहे. तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे असल्याने नागरिकांचे प्रश्न सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधत होते. राज्य विधान परिषदेच्या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी ठाकरे कामकाजात सहभागी झाले होते.

तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे : उद्धव ठाकरेंनी मोठे वक्तव्य करून अजित पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत मी अडीच वर्षे काम केले आहे, त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. इतरांनी सत्तेसाठी धाव घेतली तरी, अजित पवार जनतेला मदत करतील याची मला खात्री आहे. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा त्यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते जनतेचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

जनतेकडे दुर्लक्ष करू नका : नवीन शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या सरकारवर प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, सरकारने राज्यासाठी चांगले काम केले पाहिजे. राज्यात असंख्य प्रश्न आहेत. काही भागात आता पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पुराचे पाणी घरात शिरले आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करु नये अशी विनंती ठाकरेंनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.

जनता मूर्ख नाही : सध्याच्या राजकारणाबाबत ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील जनता एवढी मूर्ख नाही की, त्यांना सत्तेचा खेळ समजणार नाही. हा डोळे नसलेला आंधळा ध्रुतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यावर मी शुभेच्छा दिल्या होत्या असे देखील ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - Uddhav Thackeray On INDIA : बंगळुरात देशप्रेमी पक्षांची बैठक - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.