ETV Bharat / state

Fadanavis Criticized Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना झाली कलंकाचा कावीळ - देवेंद्र फडणवीस

शिवसेना ठाकरे (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात नागपूरच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत त्यांचा थेट ‘कलंक’ असा उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपाला देवेंद्र फडवणीस यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांना कलंकाची कावीळ झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Fadanavis Criticized Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 10, 2023, 10:45 PM IST

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला सडेतोड उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ज्या लोकांवर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून तुम्ही शेण खाल्ले याला कलंक म्हणतात का? आमच्या सर्वांच्या हृदयस्थानी असलेले हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना 'जनाब' संबोधन सहन केले याला कलंक म्हणतात का? सतत वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात याला कलंक म्हणतात का? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात गळे घालणे, याला कलंक म्हणतात का? तुमच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी असताना तुम्हीच चक्क पोलिसांना वसुलीला लावले, याला कलंक म्हणतात का? ज्यांनी उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवली त्या पोलिसांची पाठराखण करत, तो लादेन आहे का? असे विचारले, याला कलंक म्हणतात का? मुंबईत कोरोनाच्या काळात लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्येसुद्धा तुम्ही घोटाळा केला, याला कलंक म्हणतात का? लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता तुम्ही केवळ लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारत आहात, याला कलंक म्हणतात का? अशा प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी केली आहे. असो, तुम्ही स्वत: कलंकित असल्याने तुम्हाला इतरही कलंकित दिसायला लागले आहेत. तुम्हाला ‘कलंकीची कावीळ’ झाली असेल तर एकदा नक्की उपचार करून घ्या, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले.

  • ‘कलंकीचा काविळ’ !

    1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
    2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
    3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान… pic.twitter.com/efd6rdG8d2

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? : उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये केलेल्या आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप जनतेला भर सभेत ऐकवली. त्यानंतर ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस यांनी काही बोलताना भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीच सरकार स्थापन करणार नाही. एकवेळ सत्तेशिवाय राहीन; पण राष्ट्रवादीसोबत कधीच सत्ता स्थापन करणार नाही, असे म्हणाले होते. या जुन्या व्हिडिओ क्लिपद्वारे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या ऑडिओ क्लिपवर महाराष्ट्रात बरीच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा:

  1. Uddhav Thackeray : 'राम मंदिर भाजपमुळे बनले नाही, तर..' उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
  2. Uddhav Thackeray : 'देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक', उद्धव ठाकरेंची जहरी टीका
  3. Maharashtra Political Crisis : अजित पवार अर्थमंत्री होणार असल्याच्या चर्चेने शिंदे गटात अस्वस्थता, म्हणूनच होतोय मंत्रीमंडळ विस्ताराला उशीर?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.