मुंबई - दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या आधारामुळे आपण जिंकू शकलो. त्यांच्यासाठी आता आपली गरज आहे. त्यामुळे गावपातळीवर व तालुका स्तरावर शेतकरी मदत केंद्र उभारा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. शनिवारी सेनाभवनात सर्व जिल्हाप्रमुखांची उध्दव ठाकरे यांनी बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - नितीन गडकरी मुंबईत दाखल, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता
नुकसानग्रस्तांची पाहणी केली असता त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, मला शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये राजकारण आणायचे नाही. तसेच आपले प्रथम प्राधान्य शेतकरी असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ज्या ठिकाणी मदत केंद्र उभारण्यास अडचणी येत आहेत. अशावेळी माझी मदत घ्या असा सल्लाही त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना दिला. शेतकरी मदत केंद्रात शेतकऱ्यांना फॉर्म वाटून नुकसानाबाबत माहिती घेऊन मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बैठकीला 35 जिल्हाप्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा - 'महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा डाव, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल