ETV Bharat / state

Uddhav Thackeray: ठाकरे गटात पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट होणार? विभागप्रमुख पदासाठी 'यांना' संधी मिळण्याची शक्यता - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Uddhav Thackeray : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले त्यावेळी फक्त आमदार गेले होते. त्यानंतर हळूहळू माजी आमदार, खासदार, माजी खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पक्षात प्रवेश करू लागले. खरंतर मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने ठाकरे गटाकडून पुन्हा संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. दरम्यान, अनिल परब व सुनील प्रभूंच्या जागी विभागप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार या चर्चांना उधाण आलं आहे.

Uddhav Thackeray
ठाकरे गटात पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 10:37 PM IST

मुंबई Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यानंतर ठाकरे गट व शिंदे गटात इंनकमिंग व आऊटगोईंग सुरु आहे. दसरा मेळाव्याच्या दोन दिवस आधी ठाकरे गटातील पदाधिकारी मीनाताई कांबळीसह (Meenatai Kambli) शेकोडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र यानंतर दोनच दिवसांत भाजपातील माजी प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांनी शेकोडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटात पदाधिकारी विस्तार केला होता. मात्र आता पुन्हा एकाद ठाकरे गटात पदाधिकारी तसेच विभागप्रमुखपदी विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. याला दोन महत्त्वाची कारणे आहेत.

अनिल परब व सुनील प्रभूंच्या जागी कोण? : मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी नेतेपदी आमदार अनिल परब (Anil Parab) व सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्याकडे असलेला विभागप्रमुख पदाचा अतिरिक्त भार कमी करण्याच्या हालचाली मातोश्रीतून सुरू झाल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, अनिल परब व सुनील प्रभूंच्या जागी विभागप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार यावर चर्चांना उधाण आलं आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणुकीच्या तोंडावर मोर्चेबांधणीसाठी आणि पक्षबांधणीसाठी विभागप्रमुखांच्या नव्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे समजते. यामुळं लोकांशी ज्यांचा चांगला संपर्क असलेल्यांना विभागप्रमुख पदासाठी संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय. यामुळं विभागप्रमुख पदासाठी काहींची नावे चर्चेत असून, काहींनी मोर्चेंबाधणीसाठी मातोश्रीवर गर्दी करायला सुरुवात केली असून, काही नावे समोर आल्याची माहिती देखील समोर आली आहेत.

विभागप्रमुख पदासाठी कोणती नावे चर्चेत? : वांद्रे ते अंधेरीपर्यंत माजी मंत्री अनिल परब यांनी चांगला जम बसवलेला आहे. परब यांच्या जागी माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, माजी सुधार समिती अध्यक्ष सदा परब, माजी विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर, हारुन खान, राजू पेडणेकर यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. पण या विभागात अनिल परब यांच्या मर्जीतील व तेच सांगतील त्या पदाधिकाऱ्याची वर्णी लागू शकते. तर दिंडोशी, गोरेगाव आणि जोगेश्वरी या विभागामध्ये प्रभू, वायकर आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचे प्रशांत कदम, भाई मिर्लेकर हे विश्वासू मानले जातात. तर विश्वनाथ सावंत सक्षम नेतृत्व आहेत. विभागात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तर दुसरीकडे दिलीप शिंदे, राजू पाध्दे, प्रशांत कदम, समीर देसाई, विश्वनाथ सावंत, भाई मिर्लेकर आदींच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळं आगामी काळात या दोन विभागासाठी कोणत्या दोन नवीन विभागप्रमुखांची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे.

हेही वाचा -

  1. Dasara Melava Inside Story : दसरा मेळाव्याकरिता गर्दी गोळा करणं शक्य झालं नसल्यानं शिंदे गटाला ११० बस कराव्या लागल्या रद्द, वाचा सविस्तर
  2. Shinde Group Dasara Melava : '५० खोक्यांचा आरोप करून आम्हालाच ५० कोटी मागता, तुम्ही निर्लज्ज...', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
  3. Muslim Activists In Dussehra Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून 15 हजार मुस्लिम कार्यकर्ते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.