मुंबई- जगाला विळखा घातलेल्या कोरणा विषाणूच्या प्रादुर्भावाशी प्रशासन लढा देत असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आणखी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्तपदी विजय सिंघल व नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय बदल्या खालील प्रमाणे-
1. रणजित कुमार- संचालक, माहिती तंत्रज्ञान मुंबई
2. एमजी अर्दड- आयुक्त, मृद व जलसंधारण औरंगाबाद
3. विजय सिंघल- महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे
4. एल. एस माळी - उपसचिव, ग्रामविकास विभाग, मुंबई
5. अभिजीत बांगर - (आदेशामध्ये अंशतः बदल करुन) अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर
6. यु. ए. जाधव - (आदेशामध्ये अंशतः बदल करुन) उपसचिव, ग्रामविकास विभाग मुंबई
7. मदन नागरगोजे - सहसचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई