ETV Bharat / state

Uddhav Thackeray : एक-एक फोडण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान - uddhav thackeray on bjp

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. सायन कोळिवाडा येथील शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. एक-एक फोडण्यापेक्षा थेट निवडणुका घ्या आणि मग बघू काय होते, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले आहे.

Uddhav Thackeray Criticized On CM
उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jul 29, 2023, 7:14 PM IST

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि मुंबई महापालिकेचे तीन वेळा शिक्षण सभापती असलेले मंगेश सातमकर आणि माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेच्या शिंदे गटात प्रवेश केला. नरिमन पॉइंट येथील बाळासाहेब भवन येथे इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता या दोन्ही नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी या कार्यकर्त्यांनी आपण मातोश्री सोबत असल्याचे आश्वासन दिले आहे. मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उध्दव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जे गेली आहेत त्यांना माझा जय महाराष्ट्र : मुंबईच्या सायन कोळीवाडा विभागाचे विभाग प्रमुख प्रमोद शेंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मातोश्री गाठली आणि आपण अजूनही पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले. मातोश्रीवर कार्यकर्त्यांसमवेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, ज्यांना अजूनही तिकडे जायचे आहे त्यांनी खुशाल जावे. ही लोक तिकडे गेल्याने आपल्या शिवसेनेच्या समुद्राला अधिक उधाण येत आहेत. यांच्या अशा वागण्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनात राग आहे. चीड आहे, जिद्द आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातील आगामी सर्व निवडणुका जिंकण्याची इर्षाही तितकीच वाढत आहे. आता जी लोकं त्यांच्याकडे गेली आहेत त्यांना माझा जय महाराष्ट्र. फक्त तिकडे गेल्यावर घाण करू नका. नाहीतर शिवसैनिक काय असतो हे दाखवून द्यावे लागेल.

उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान : पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीच्या दृष्टीने आपले भक्कम मतदारसंघ अधिक मजबूत केले पाहिजेत. तेवढी ताकद तुमच्यात आहेच. आपल्यातून कुणी तिकडे गेले की, लगेच बातम्या येतात मातोश्रीला धक्का, ठाकरेंना धक्का. पण हा धक्का म्हणजे काय? आता आपल्याकडे जी भरती होणार आहे त्याने यांना धक्का बसणार आहे. एवढे करून पण पक्ष संपला नाही. उध्दव ठाकरे संपला नाही हे त्यांचे दुःख आहे. तुमचा पाठिंबा, तुमचा आधार, समर्थन बघून त्यांना धडकी भरली आहे. त्यांना भीती वाटते तुमची. माझे त्यांना एकच सांगणे आहे. असे एक एक करून फोडण्यापेक्षा एकदाच घ्या काय घ्यायचे ते. नाहीतर घ्या निवडणूका आणि जा सामोरे जनतेला.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackeray Visit : विदर्भात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; उद्यापासून दौरा सुरू
  2. CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिदेंचा ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, 'तुमच्यासारखा सत्तेसाठी मिंधा होणारा नाही..'
  3. Maharashtra Political Crisis: ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाचा लवकरच निकाल, उद्या सुप्रीम कोर्टात सर्व बाजूंची सुनावणी होणार पूर्ण

माहिती देताना उध्दव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.