मुंबई - यापुढे निवडणुका घेत, मी पुन्हा येईन असे म्हणण्यापेक्षा मी जाणारच नाही, असे म्हणावे, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
आज झालेल्या राजकिय भुकंपानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळ ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, पाकवर सर्जिकल स्ट्राईक करावा, असा भाजपने फर्जिकल स्ट्राईक राज्यावर झाला आहे. यापुढे निवडणुका घेऊच नका, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. आम्ही एकत्र आहोत. शिवरायांच्या महाराष्ट्रात पाठीत खंजिर खुपसण्याचे काम त्यांनी केले. आम्ही जे केले, ते उजेडात केले. पण, त्यांनी रात्रीस खेळ चाले असे सुरू आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. हरियाणा, बिहार, कर्नाटकात जे केले तेच या राज्यात करत जनादेशाचा अनादर केला. आम्ही विरोधात बसणार असे म्हणणाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने सत्ता हस्तगत केल्याचा आरोप त्यांनी केला.
मी पणा विरूद्ध लढाई
विरोधी पक्ष नको, मित्रपक्ष नको, स्वतःची माणसे नको, असे करत केवळ मीपणा करणाऱ्या विरोधात ही लढाई असल्याचे ठाकरे म्हणाले.