ETV Bharat / state

Uddhav Thackeray Birthday : महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय चेहरा

उद्धव ठाकरे गुरवारी आपला ६३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ते सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय चेहरा आहेत. ते ज्या पद्धतीने सत्तेवर आले ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले. नंतर त्यांना पायउतार व्हावे लागले. 27 जुलै 1960 रोजी जन्मलेले उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र. जाणुन घेउ त्यांचा प्रवास. (Uddhav Thackeray Birthday)

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 27, 2023, 4:08 AM IST

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या निवडणुकीशी संबंधित कामांमध्येही सक्रिय सहभाग घेत राजकारणात काम सुरु केले. 2002 मधील बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाने विजय मिळवल्यानंतर, जानेवारी 2003 मध्ये त्यांना पक्षाचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे आणि पक्षाचे प्रमुख नेते नारायण राणे यांच्यातील मतभेद वाढले, त्यानंतर राणेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील मतभेद वाढत असताना 2006 साली राज यांनी शिवसेना सोडून नवा पक्ष काढला.

Uddhav Thackeray has a different style of speech
उद्धव ठाकरे यांची भाषणाची वेगळी शैली आहे

व्यावसायिक छायाचित्रकार : राजकारणाच्या जगात असण्याबरोबरच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणखी एक बाजू आहे ती म्हणजे ते एक व्यावसायिक वन्यजीव छायाचित्रकार आहेत त्यांचे सोशल मीडिया फीड लँडस्केप आणि वन्यजीवांच्या पोर्ट्रेट शॉट्ससह मंत्रमुग्ध करणाऱ्या फोटोंनी भरलेले आहे. ते हवाई आणि वन्यजीव छायाचित्रणासाठी ओळखले जातात. त्यांनी राज्याच्या किल्ल्यांवर असलेले महाराष्ट्र देश (2010) आणि पंढरपूर वारी वरील पहावा विठ्ठल (2011) हे दोन सचित्र पुस्तकेही काढलेले आहेत. वडील बाळासाहेबांच्या कलात्मक कौशल्याचा वारसा त्यांनी सिद्ध केल्यामुळे त्यांनी जाहिरात व्यवसायात प्रवेश केला होता. बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या आधीच्या काळात प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते.

They answer questions in their own unique style
ते प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तर देतात

आणि शिवसेनेची सूत्रे हाती : 2012 साली बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा शिवसेना संपुष्टात येईल, असे पक्षाच्या अनेक टीकाकारांनी सांगितले होते. मात्र या गोष्टी चुकीच्या असल्याचे सिद्ध करत पक्ष एकसंध ठेवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले. यासोबतच रस्त्यावर लढणाऱ्या पक्षाची जुनी प्रतिमा बदलून शिवसेनेला अधिक परिपक्व राजकीय पक्ष बनविण्यावर त्यांनी भर दिला. 2014 मध्ये, शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आणि शिवसेना हा भारतीय जनता पक्षानंतर विधानसभेत दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.

Rashmi and Uddhav Thackeray
रश्मी आणि उद्धव ठाकरे

वैवाहिक जीवन: रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे लग्न कसे झाले किंवा ते पहिल्यांदा कसे भेटले हे फार कमी लोकांना माहीत आहे. रश्मी ठाकरे या एका मध्यमवर्गीय कुटुंबातुन पुढे आल्या. त्या मूळच्या डोंबिवलीकर आहेत. त्यांचे माहेरचे नाव रश्मी माधव पाटणकर. त्यांनी मुलुंडच्या वाजे-केळकर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. रश्मी ठाकरे 1987 मध्ये एलआयसी मध्ये रुजू झाल्या. तेथे काम करताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्याशी मैत्री झाली. रश्मी ठाकरे आणि जयवंती ठाकरे या एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या.

Aditya and Uddhav Thackeray
आदित्य आणि उद्धव ठाकरे

ओळखीचे रुपांतर मैत्रीत : जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहीण आहेत. जयवंती यांच्या माध्यमातून रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रिय नव्हते, ते फोटोग्राफी करायचे. उद्धव ठाकरेंनी जाहिरात एजन्सीही सुरू केली. रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची रेशमी नाती अशीच जुळून आली. आणि त्यांनी 13 डिसेंबर 1989 रोजी एकमेकांशी गाठ बांधली.

He handled the situation with patience during Corona
कोरोना काळात त्यांनी संयमाने स्थिती हाताळली

सत्तेत येणारे पहिले ठाकरे: त्यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अडीच वर्षानंतर 29 जून 2022 रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ठाकरे यांची 2001 मध्ये पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचे लहान चुलत भाऊ राज ठाकरे, अधिक करिष्माई आणि आक्रमक मानले जातात या उदात्तीकरणामुळे पक्षात फूट पडली. ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी 2005 मध्ये राजीनामा दिला, त्यानंतर राज यांनी राजीनामा दिला. पण या वादळातून शिवसेनेला महत्त्वाची बृहन्मुंबई महानगरपालिका जिंकण्यात यश आले आणि 2000 च्या दशकात ठाणे महापालिकेच्या निवडणुकांतही यश मिळवले.

Selection as Chief Minister of Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीचे मु्ख्यमंत्री म्हणुन निवड

आणि घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ : 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे मार्ग स्विकारले. मात्र दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास येण्यासाठी ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व केले. राज्य विधानसभेत भाजपनंतर जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला. मात्र नंतर शिवसेना पुन्हा भाजप सोबत सत्तेत सहभागी झाली आपल्या आक्रमक वडिलांच्या तुलनेत मृदुभाषी मानले जाणारे उद्धव ठाकरे यांनी नंतर महाविकास आघाडीचा प्रयोग करत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजकीय पद धारण करणारे त्यांच्या कुटुंबातील पहिले ठाकरे ठरले. अडीच वर्षांनंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि बहुसंख्य आमदार त्यांच्या सोबत गेल्यावर त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले त्या नंतरही उर्वरीत शिवसेना संभाळत पुन्हा पक्ष बांधनीचे मोठे आव्हान स्विकारत ते वाटचाल करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.