मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा खारघरमध्ये उष्माघाताने अकरा रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एमजीएम कामोठे रुग्णालयाला मध्यरात्री भेट दिली. खारघर येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण या पुरस्कार सोहळ्याचे योग्य नियोजन केले नव्हते. उष्माघाताने त्रस्त झालेल्या रुग्णांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली आहे. मी चार ते पाच रुग्णांशी संवाद साधला. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक होती. कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले नव्हते. या घटनेची चौकशी कोण करणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी : या घटनेनंतर तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांसाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यांनी पुढे नमूद केले की, उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्य सरकार उचलणार आहे. रविवारी खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी काही सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले, दुर्दैवाने त्यापैकी 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, ही अत्यंत अनपेक्षित व वेदनादायी घटना आहे. दिवंगत झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली, आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही ठाकरे म्हणाले.
साडेतेरा कोटी रुपये खर्चूनही कार्यक्रमाचे नियोजन ढिसाळ- उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कार्यक्रमाला साडेतेरा कोटी खर्च करण्यात आला आहे. प्रथमच महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावर राज्यात एवढा खर्च करण्यात येत आहे. तरीरी नियोजन नव्हते. चेंगराचेंगरी झाली असे काहींचे म्हणणे आहे. आयोजकांनी कार्यक्रमाचे आयोजन दुपारी करण्याची गरज नव्हती. उद्धव ठाकरेंच्या काळात कोरोना आकडेवारी लपविली जाते आहे, अशी टीका केली जात होती. मात्र, अजूनही किती जणांचा मृत्यू झाला व किती उपचार घेत आहेत, याची आकडेवारी आलेली नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा साडेतेरा कोटी जनतेच्यावतीने दिला जातो. मात्र, हलगर्जीपणामुळे नको ते घडले आहे.
हलगर्जीपणा झाल्यामुळे घटना : डॉक्टर रूग्णांना वाचविण्याचा मनापासून प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार अतिशय महत्त्वाचा असा पुरस्कार आहे. हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्याचा निर्णय झाला, तोही समाधानाची बाब होती. परंतु हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकते, हे या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सदस्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि उपचार घेत असलेल्या सदस्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार उचलेल, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत, असे ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. समारंभात उष्माघाताने त्रस्त झालेल्या काही लोकांना खारघरच्या टाटा रुग्णालयातही नेण्यात आले.