ETV Bharat / state

राज्यसभा निवडणूक: उदयनराजेंसह रामदास आठवलेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३ नावांचा समावेश आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. आज छत्रपती उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांनी विधानभवनात जाऊन आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

Udaynraje bhosale and Ramdas Aathawale Filed his nomination for Rajya Sabha
उदयनराजेंसह रामदास आठवलेंनी दाखल केले उमेदवारी अर्ज
author img

By

Published : Mar 12, 2020, 2:33 PM IST

मुंबई - भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३ नावांचा समावेश आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, तर आज दुसरी यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये गोपीनाथ मुंडे गटाचे डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. आज उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांनी विधानभवनात जाऊन आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

उदयनराजेंसह रामदास आठवलेंनी दाखल केले उमेदवारी अर्ज
Rajya Sabha Election
भाजपची दुसरी यादी प्रसिद्ध

भाजपकडून संजय काकडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, भाजपने त्यांना डावलून उदयनराजे भोसले आणि भागवत कराड यांना उमेदवारी दिली आहे. आज भाजपची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये महाराष्ट्रातून डॉ. भागवत कराड, हरियाणातून रामचंद्र झांगडा आणि दुष्यंत कुमार गौतम यांना तर हिमाचल प्रदेशमधून सुश्री इन्दू गोस्वामी, मध्य प्रदेशमधून सुमेर सिंह सोलंकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.