ETV Bharat / state

Uday Samant Met Sharad Pawar : बारसू संदर्भात शरद पवार आणि उदय सामंत यांच्यात खलबते? - Uday Samant Met Sharad Pawar

बारसू रिफायनरी संदर्भातील माहिती देण्यासाठी उद्योगपती उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती, नाट्य परिषदेच्या संदर्भात भेट घेतल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

Uday Samant Met Sharad Pawar
Uday Samant Met Sharad Pawar
author img

By

Published : Apr 26, 2023, 6:07 PM IST

मुंबई : बारसू रिफायनरी संदर्भातील माहिती देण्यासाठी उद्योगपती उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती, नाट्य परिषदेच्या संदर्भात भेट घेतल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रिफायनरी प्रकल्पासंदर्भात उद्योग मंत्री, यांच्याशी फोन द्वारे संवाद साधला होता. त्यावेळी उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतची माहिती आपल्याला देतो, असे म्हणाले होते. त्याप्रमाणे आज उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. माझी तब्येत बरी नसल्याच्या बातम्यांमध्ये कोणते तथ्य नाही असेही ते म्हणाले.

चर्चा करण्यात तयार : प्रकल्पासंदर्भातील आंदोलकांच्या तेथील परिस्थिती बाबतचा सर्व आढावा मी शरद पवार यांना दिला आहे. आंदोलन ठिकाणी काही महिलांना पोलिसांनी अटक केली होती. त्या महिलांना देखील काल सोडून देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर त्यांना घरपोच सोडून जेवणाची देखील व्यवस्था केली होती. सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा केलीच पाहिजे. ही देखील आमची भूमिका असून तिथल्या स्थानिक आंदोलक, शेतकरी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही 24 तास बोलण्यास तयार आहोत. स्थानिक लोकांनी याबाबत गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन देखील उदय सामंत यांनी केले आहे.

सॉईल टेस्टिंग : कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण सुरू केले गेलेले नाही .सध्या त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंग केली जात आहे. सॉईल टेस्टिंगचा अहवाल आल्यानंतरच प्रकल्प आणायचा की नाही यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, आंदोलन स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आम्ही एक प्रेझेंटेशन देखील दाखवणार आहोत. निश्चितच स्थानिकांचे गैरसमज यातून दूर होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांची प्रकल्पाबाबत भूमिके विषयी मी सांगू शकत नाही. गेल्या आठवड्यात नेमक्या काय काय घडामोडी घडल्या या संदर्भातिला माहिती मी त्यांना दिली आहे.

विरोधकांबरोबर समर्थक देखील आहे : बार्शी मधील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होतो. मात्र दुसरीकडे आपण तर एका बाजूला विरोधक आहेत तर दुसऱ्या बाजूला समर्थक देखील समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी समर्थन दिल्याने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील वेळ मागितली आहे. बासूर प्रकल्प संदर्भात मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे, असे सावंत म्हणाले.

हेही वाचा - Naxalite attack in Dantewada : दंतेवाडात नक्षलवाद्यांचा हल्ला, IED स्फोटात 11 जवान शहीद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.