ETV Bharat / state

Uday Samant on MLAs : राज्याच्या राजकारणात आणखी फोडाफोडी, ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे गटाच्या गळाला लागणार? - उद्योगमंत्री उदय सामंत

शिवसेनेत फुटून तयार झालेला शिंदे गट पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप करणार असल्याची चर्चा आहे. या भूकंपाचे धक्के ठाकरे गट व राष्ट्रवादीला बसणार असल्याचे बोलले जात आहे.

उदय सामंत न्यूज
Uday Samant News
author img

By

Published : Apr 27, 2023, 2:02 PM IST

Updated : Apr 27, 2023, 4:44 PM IST

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणी सुनावणी आधीच मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे एका माध्यमात म्हटले आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणातम मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. रोज वेगवेगळ्या राजकीय चर्चा होत आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार तसेच राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांची महाबळेश्वर येथे बैठक झाली आहे, अशी चर्चा असल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे आता नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची चर्चा असतानाच उदय सामंत यांच्या या विधानाबाबत नव्याने केलेल्या वक्तव्यामुळे लवकरच राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीचे 20 आमदार शिंदेंच्या संपर्कात : नवी मुंबईतील खारघर येथील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवले जाणार असल्याची चर्चा आहे. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अशा अनेक चर्चा सुरू असून ठाकरे सेनेचे उर्वरित १३ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे 20 आमदार, काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

भाजप शिंदेंवर नाराज : भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिंदे यांना सोबत घेऊनही भाजपला काहीही फायदा होणार नाही, हे लक्षात आले आहे. आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे, असे भाजपच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भाजपला फायदा होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर शिंदे गटातील नाराज आमदारांसाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे उघडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाची अवस्था झाली आहे.

महाबळेश्वरमध्ये राजकीय घडामोडी : ठाकरे गटाच्या उपनेत्या, उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सूचक विधान केले आहे. पक्ष सोडून गेलेले कोणी परत येणार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वरिष्ठच ठरवतील. निवडणुकीची घोषणा, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दरम्यान काहीही होऊ शकते, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यानंतर उदय सामंत यांनी सांगितले की, अशा अनेक चर्चा आहेत. महाबळेश्वरमध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे.

हेही वाचा - National Cancer Institute Inauguration: आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे उद्घाटन

Last Updated : Apr 27, 2023, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.