मुंबई: शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. मात्र, त्यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे पक्ष, नाव यावर दावा केल्यानंतर ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, की अनेकदा आपली फसगत होते. ज्यांना आपले मानतो, तेच व्यक्ती बांडगुळ असल्याचे कालांतराने समजते. फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असताना आपल्याला सोबत असल्यासारखे वाटत राहते.
राजकीय पक्षाला चिन्ह देण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. मात्र, राजकीय पक्षांचे नाव व चिन्ह बदलण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाविरोधात निकाल दिला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयातील याचिकेतून शिवसेना हे नाव पुन्हा मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. शिवसेना हे नाव परत मिळण्यासाठी सर्व गोष्टींची पूर्तता केल्याचेही त्यांनी सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
भाजपला एनडीएमध्ये ३६ पक्षांची गरज नाही- विरोधी पक्षांनी एकजूट होत बंगळूरूमध्ये बैठक घेतली. त्यानंतर इंडिया हे विरोधी पक्षांच्या आघाडीचे नामकरण केले. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विरोधी पक्षांवर टीका केली. त्यावरून ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले, की एनडीए नावाचा अमिबा असल्याचे बऱ्याच वर्षानंतर कळाले आहे. देशप्रेमी राजकारणी लोकांनी आघाडी केली असताना पंतप्रधान मोदी यांना आठवण आली. त्यातूनच त्यांनी छत्तीस पक्षांची जेवणावळ घातली. मोदी सरकारकडून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआय व प्राप्तिकर विभागाचा वापर होत असल्याची टीका होते. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, की भाजपला एनडीएमध्ये ३६ पक्षांची गरज नाही. खरे तर ईडी, प्राप्तीकर व सीबीआय हे तीन पक्षच त्यांना पुरेसे आहेत.
शिवसेनेतील बंडखोरी ही अयोग्य व महाराष्ट्रातील संस्कृतीला अनुसरून नसल्याचे लोक म्हणत आहेत. त्यामुळे मला अधिक सांगण्याची गरज नाही-उद्धव ठाकरे
शिवसेनेतील बंडखोरी ही अयोग्य- मनाने विकलेल्या लोकांपेक्षा मूठभर असणारी निष्ठावान माणसे मला हवी आहेत. गद्दारांपेक्षा अशी निष्ठावंत लोक हीच खरी शक्ती असते. महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षांत जे काही केले, त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता कुटुंबातील सदस्य मानत असल्याचा ठाकरे यांनी दावा केला आहे. पुढे ते म्हणाले, की हीच माझी मोठी कमाई आहे. शिवसेनेसोबत पूर्वीहून अधिक जनता जोडली आहे.
हेही वाचा-