मुंबई- क्रिसन परेरा व्हिडिओ कॉलमध्ये बोलत असताना तिच्या कुटुंबातील सदस्य आनंदाने नाचत व रडत असल्याचे दिसत आहे. कुटुंबातील सर्वजण तिला लवकर घरी परत ये, असे म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दोन आरोपींना एका ट्रॉफीमध्ये अमली पदार्थ देऊन क्रिसनला शारजाहमध्ये पाठविले होते. यानंतर क्रिसन १ एप्रिलपासून शारजाहमध्ये कैदेत आहे. अभिनेत्रीच्या आईने मुंबई गुन्हे शाखेत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. 32 वर्षीय अँथनी पॉल आणि 42 वर्षीय राजेश दामोदर बोबाटे उर्फ रवी, अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना 4 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. अँथनी पॉल हा मुंबईतील बोरिवलीचा रहिवासी आहे. तर त्याचा साथीदार राजेश बाभोटे उर्फ रवी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जुने वैमनस्य असल्याने रचला कट- क्रिसनसह दोन जणांना शारजाह पोलिसांनी अटक केली आहे. इतर तिघेजणांनी शारजाहमधील अधिकाऱ्यांची नजर चुकवित यश मिळविण्यात आले. परेरा कुटुंबियांविरोधात जुने वैमनस्य असल्याचा राग काढत पॉलने क्रिसनचा गुन्ह्यात अडकविल्याची माहिती समोर आली आहे. पॉलने यापूर्वीदेखील काही जणांची अशीच फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. क्रिसनने वेबसिरीज सडक २ मध्ये काम केले आहे. ती कुटुंबासह बोरिवली उपगनरात राहते.
पोलिसांकडून फसवणूक झालेल्या व्यक्तींचा शोध सुरू- अभिनेत्री क्रिसन परेराला फसवण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. पोलिस अधिकार्यांकडून असे समजले की, आरोपी पॉलने या प्रकरणात अभिनेत्रीची आई प्रेमिला परेरा यांच्याविरुद्ध सूड उगवण्यासाठी फसवणुकीचा कट रचला होता. पॉलने त्याचा साथीदार रवी याच्यासोबत क्रिसनला आंतरराष्ट्रीय वेब सीरिजच्या कथित ऑडिशनसाठी यूएईला पाठवण्याची थाप मारली. विमानतळावर जाताना ट्रॉफी देऊन त्यामध्ये ड्रग्ज लपवले होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पॉलने क्रिसनसारख्या इतर चार लोकांनाही अशाच प्रकारे फसवले होते. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.