मुंबई : सेवा विकास सहकारी बँकेच्या तक्रारी आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांनी केलेल्या लेखापरीक्षणाच्या आधारे पुणे पोलीसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याने सेवा विकास सहकारी बँकेचे 429 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या गुणांचा तपास ईडीकडे वर्ग करण्यात आला. सेवा विकास सहकारी बँकेतील फसवणुकीच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईने पीएमएलए 2002 च्या तरतुदींनुसार आज तीन जणांना अटक केली आहे.
फसवणूक प्रकरणाचा ईडीचा तपास: सेवा विकास सहकारी बँक फसवणूक प्रकरणाचा ईडी तपास करत असून ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, सहकारी बँक कोणत्याही दुरदूर्षी आर्थिक अटी शर्थिंचे पालन न करता कौटुंबिक मालकीप्रमाणे चालविली जात होती आणि कोणत्याही व्यवहार्य सुरक्षेशिवाय आणि अर्जदाराच्या कर्ज परतफेडची पात्रता न तपासता कर्ज मंजूर केले जात होते.
साक्षीदारांना धमकावण्याचे काम: 92% पेक्षा जास्त कर्ज खाती NPA झाली आणि आता बँक दिवाळखोरीत गेली आहे. याप्रकरणी ईडीने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. छापेमारीतील तपासादरम्यान, ईडी कार्यालयाच्या परिसरात एक व्यक्ती वारंवार लपून बसत असल्याच्या निरिक्षणाच्या आधारे, त्याला रोखण्यात आले आणि तो बाबू सोनकर (अमर मुलचंदानीचा कर्मचारी) असल्याचे आढळून आले आहे. त्याला मुलचंदानी कुटुंबीयांमार्फत साक्षीदारांना धमकावण्याचे काम दिले होते.
कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक: ईडी कार्यालयात काम करणार्या एका डेटा एंट्री ऑपरेटर आणि एका कर्मचार्यांना लाच देऊन ईडी कार्यालयातील संवेदनशील माहिती दिली आहे. या माहितीच्या बदल्यात लाचेची रक्कम घेणाऱ्या ईडीच्या मुंबई कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बबलू सोनकरच्या ताब्यातून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून ईडीच्या या कर्मचाऱ्यांनी हे बेकायदेशीर कृत्य केल्याचे मान्य केले आहे. दोघेही गुप्त आणि संवेदनशील माहिती बबलू सोनकरला देत होते. त्यानुसार त्यांना पीएमएलए अंतर्गत अटकही करण्यात आली आहे. ईडीचा पुढील तपास सुरू आहे.