ETV Bharat / state

नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वाराने पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडी

काही बेशिस्त नागरिक कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही जुमानत नसल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील वाडी बंदर परिसरात पी डिमेलो रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत पोलीस निरीक्षक जखमी झाले आहेत.

two-wheeler-ride
दुचाकीस्वार
author img

By

Published : Apr 10, 2020, 12:29 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात शहरात होणाऱ्या अवैध वाहतुकीवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, काही बेशिस्त नागरिक कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही जुमानत नसल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील वाडी बंदर परिसरात पी डिमेलो रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत पोलीस निरीक्षक जखमी झाले आहेत.

दुचाकीस्वाराने पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडी

सहायक पोलीस निरीक्षक विजेंद्र विष्णू धुरत हे नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत होते. त्यांनी एका दुचाकीस्वाराला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दुचाकीस्वाराने मोटारसायकल भरधाव वेगाने पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातली. हा सगळा प्रकार सीसीटिव्हीतमध्ये कैद झाला आहे.

विजेंद्र धुरत यांनी मोटार सायकल पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना फरफटत पुढे नेले. जखमी विजेंद्र धुरत यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी खाजाबी शेख नईम या आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयाने 10 एप्रिलपर्यँत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.