ETV Bharat / state

सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा दोघांचा प्रयत्न, पोलिसांनी ताब्यात घेऊन केली अटक

अभिनेता सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये दोघांनी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यानंतर ते काय उद्देशाने घुसले याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू झालीय.

Salman Khan
सलमान खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 3:11 PM IST

Updated : Jan 8, 2024, 5:16 PM IST

मुंबई : अभिनेता सलमान खानचं पनवेलमधील फार्म हाऊस पुन्हा एकदा चर्चेत आलंय. यामध्ये दोन जणांनी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केलाय. याप्रकरणी पनवेल पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. अजेश कुमार ओम प्रकाश गीला आणि गुरू सेवक सिंग तेजा सिंग सिख (दोघेही रा.पंजाब) अशी दोघांची नावं आहेत. काल रविवार (6 जानेवारी) रोजी दुपारी 4 च्या सुमारास दोन व्यक्ती कुणाचीही परवानगी न घेता सलमान खानच्या फार्म हाऊसच्या मेन गेटच्या डाव्या बाजूने कंपाउंडमधून फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सुरक्षा रक्षकांचं लक्ष गेल्याने त्या दोघांनाही त्यांनी पकडून तत्काळ पोलिसांच्या हवाली केलं. दोघंही आम्ही सलमान खानचे चाहते असल्याचं सांगत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोघांची तपासणी केली असून त्यांच्याकडे आधारकार्डही सापडली आहेत.

खोटी माहिती सांगितली : या दोन तरुणांनी फार्महाऊसला असलेल्या तारा तोडून गेटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फार्महाऊसच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं. तेव्हा त्या दोन तरूणांनी आपली खरी ओळख लपवण्याच्या बहाण्याने ने खोटी नावं सांगितली. खरी नावं अजेश कुमार ओम प्रकाश गीला आणि गुरू सेवक सिंग तेजा सिंग सिख (दोघेही रा.पंजाब) अशी असताना महेशकुमार रामनिवास व विनोदकुमार राधेशाम अशी आमची नावं असल्याचं सांगितलं. तसंच, पंजाबचे राहणारे असतानाही त्यांनी आपण उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांच्या बोलण्यावर सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने पोलिसांना बोलावून या दोघा तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलिसी खाक्याला घाबरले : पनवेल पोलिसांनी आपल्या ताब्यात घेत या दोन तरुणांना चांगलाच दम भरला. त्यानंतर आधी गरम असलेले हे दोघही तरुण नंतर नरम झाले आणि आपली खरी नावं सांगितली. त्यानंतर त्यांच्या मोबाईल फोनचीही तपासणी केली असता, दोघांनी आपलं छायाचित्रं वापरून बनावट नावाने आधार कार्ड बनवल्याचं समोर आलं. त्यानंतर सर्वच बाबी संशयास्पद आढळल्याने अखेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान, आपण सलमान खानचे चाहते असून, आपण त्याला भेटण्यासाठी हा घुसखोरीचा खटाटोप केला, असं त्यांनी चौकशीत सांगितल्याची सुत्रांची माहिती आहे.

हेही वाचा :

1 महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवणारं 'ते' पत्र फेक; पोलिसांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणार

2 बिल्किस बानो प्रकरणात 'सर्वोच्च' निकाल, गुजरात सरकारचा आदेश रद्द; दोषींची पुन्हा तुरुंगात रवानगी

3 प्रेयसीनं प्रियकराचा प्रायव्हेट पार्टच कापला, 'हे' कारण आले समोर

Last Updated : Jan 8, 2024, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.