ETV Bharat / state

मुंबईत पावसाच्या साचलेल्या पाण्यात कार अडकल्याने दोघांचा मृत्यू - मृत्यू

गाडीतील दोघेही घरी परतत असताना गाडी मालाड सबवेत सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास जवळपास 10 फूट पाण्यात अडकली होती.

मुंबईत पावसाच्या साचलेल्या पाण्यात कार अडकल्याने दोघांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 2, 2019, 7:15 PM IST

Updated : Jul 2, 2019, 8:10 PM IST

मुंबई - मालाड सबवेमध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये एक कार अडकून 2 मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री तीनच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडी पाण्यामध्ये अडकली होती. यामधील दोघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. इरफान खान (वय 37), गुलशद शेख (वय 38) अशी मृतांची नावे आहेत. मालाडमधून मित्राच्या स्कॉर्पिओ गाडीतून आपल्या घरी कुरार व्हिलेज व कोकणी पाड्यात जात असताना पावसाच्या पाण्यात गाडी अडकून यांचा मृत्यू झाला.

मुंबईत पावसाच्या साचलेल्या पाण्यात कार अडकल्याने दोघांचा मृत्यू

गाडीतील दोघेही घरी परतत असताना गाडी मालाड सबवेत सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास जवळपास 10 फूट पाण्यात अडकली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पाणी जास्त असल्यामुळे आज पहाटे त्यांना गाडीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोघांनाही शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, अंधेरी सबवेत सोमवारी रात्री 12 वाजून 07 मिनिटांच्या सुमारास होंडा कार पाण्यात अडकली होती. यातील 2 प्रवाशांना पोलीस व स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले आहे.

Intro:मुंबई - गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाड व अंधेरी सबवे जलमय झाले होते. या दोन्ही सबवेत गाड्यासह चालक अडकून पडले होते. मालाडच्या साईनाथ सबवेत स्क्रोर्पिओ गाडीत अडकलेल्या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. इरफान खान(37 वर्ष), गुलशद शेख (38वर्ष) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.Body:सदर दोघेही घरी परतत असताना स्कॉर्पिओ गाडी मालाड सबवेत सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास जवळपास 10 फूट पाण्यात अडकली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र पाणी खूप असल्याने आज पहाटे त्यांना गाडीतून बाहेर काढण्यात आले. तर गाडीतील दोघांनाही बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.Conclusion: या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान अग्निशमन दलाचे जवान रॉकी फर्नांडिस यांच्या पायाला मार लागला, त्यांच्यावर प्रथम खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करून नंतर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अंधेरी सबवेत सोमवारी रात्री 12 वाजून 07 मिनिटांच्या सुमारास होंडा कार पाण्यात अडकली होती. यातील 2 प्रवाशांना पोलीस व स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले.
Last Updated : Jul 2, 2019, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.