मुंबई - महायुती सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी आता राज्य सरकारने द्विसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महायुती शासनाच्या काळात विरोधक तसेच तत्कालीन सत्ताधारी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा - 'मुख्यमंत्री ठाकरेंचे सीएएला समर्थन; तर एनआरसीला विरोध
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता सरकारने अप्पर मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि गुप्तचर विभागाचे सहायक आयुक्त यांची द्विसदसिय समिती नेमली आहे. नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रान उठवले होते. तसेच शिवसेनेच्या काही नेत्यांनीही चौकशीची मागणी केली होती.
हेही वाचा - CAA, NRC विरोधात असहकार करणार - कॉ. सीताराम येचुरी
प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी यांनी इस्रायलमधून फोन टॅपिंग यंत्र आणून हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांचे खंडन केले होते. तसेच कोणत्याही चौकशीसाठी कोणतीही हरकत नाही. या शिवाय इस्रायलला जाऊन सरकारने चौकशी करावी, असेही फडणवीस यांनी म्हटले होते.