मुंबई - शिवसेना भवनात अजून दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. या अगोदर शिवसेना भवनात ज्येष्ठ शिवसैनिक कोरोनाबाधित आढळले होते. शिवसेना भवनात कार्यालयीन काम पाहणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी कोरोना रुग्ण आढळल्याने सेनाभवन निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आले होते.
निर्जंतुकीकरण केल्या नंतर आठवडाभर बंद असलेलं शिवसेना भवन सोमवारपासून पुन्हा सुरू होणार होते.